युवा नेते जशराज पाटील(बाबा) यांनी हणबरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा घेवून केला टाळ मृदुंगाच्या गजरात हरी नामाचा जागर.*
*युवा नेते जशराज पाटील(बाबा) यांनी हणबरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा घेवून केला टाळ मृदुंगाच्या गजरात हरी नामाचा जागर.*
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय जशराज पाटील (बाबा) गेल्या १० वर्षांपासून आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडीतून पायी वारी करतात, तथापि या वर्षी काही कामामुळे त्यांना या वारीमध्ये सहभागी होता आले नसल्याने, त्यांनी हणबरवाडी ता. कराड येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये परंपरागत वीणा घेवून टाळ मृदुंगाच्या गजरात हरि नामाचा जागर केला.
हणबरवाडी गावामध्ये १०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड हरिनामासाठी वीणा घेण्याची परंपरा सुरू असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये वीणा खाली ठेवला जात नाही. गावातील ग्रामस्थांकडून हि परंपरा मोठ्या भक्ती भावाने जोपासली जात आहे. या गावाला सांप्रदायाची विशेष आवड असून, गावातील ग्रामस्थांकडून भजन, किर्तन, हरिपाठ, प्रवचन, हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
या सांप्रदायिक परंपरा जोपासणाऱ्या हणबरवाडी गावामध्ये सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय जशराज पाटील (बाबा) यांनी दोन तास वीणा घेवून हरिनामाचा जागर केला.
याप्रसंगी त्यांच्यासोबत सर्वश्री व्यंकट शेडगे, राजेंद्र जाधव सर, शिवाजीराव जाधव, दत्तात्रय शेलार, सिद्धार्थ चव्हाण, गणेश नलवडे, सत्यवान शेडगे, दादासो पवार, जयसिंग पवार, ईश्वर पवार, संजय पवार, सरपंच प्रल्हाद कुंभार, सुनील घाडगे, पांडुरंग पुजारी, गजानन शेडगे, हणमंत शेडगे, भानुदास निगडे, शिवाजी पवार, सुनील पंदूगडे, रामचंद्र पवार, संभाजी देसाई, विलास कदम, राजेंद्र शेडगे, लक्ष्मण शेडगे, सुरेश पवार, अशोक पवार, अशोक शेडगे, रंगनाथ शेजवळ, अरुण ढेरे, शहाजी देसाई, संभाजी पाटील, श्रीकांत पाटील, बाळासो पवार, नारायण शेडगे, प्रफुल ढेरे, सचिन ढेरे, संदीप पाळेकर, चंद्रकांत ढेरे, राहुल कुंभार, कल्पेश पवार, शंभूराज शेडगे, विवेक पवार, संदेश शेडगे, पंकज शेडगे, ऋषिकेश कुंभार, गौरव पवार, अथर्व मोरे, विशाल शेडगे, वेदांत ढेरे, विवेक पवार, कुणाल ढेरे, मनीष निगडे, आदित्य पवार, प्रणय पुजारी, शुभम ढेरे यांचेसह भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.जशराज पाटील (बाबा) हे गेल्या अनेक वर्षांपासून सांप्रदायाचा वसा जोपासत असल्याने तरूणांसह जेष्ठांकडून त्यांचे विशेष कौतूक होत आहे.
Comments
Post a Comment