रिपोर्टर अक्षय दोशी लोणंद माऊलींच्या पादुकांचे दर्शन भाविकांची अलोट गर्दी हरिनामाच्या गजराने लोणंद नगरी दुमदुमली

रिपोर्टर अक्षय दोशी लोणंद माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लोणंदनगरीत भाविकांचा महापूर लोटला. माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. माऊलींचा पालखी सोहळा लोणंद नगरीत विसावल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लोणंदच्या पालखी तळावर महिला व पुरुष अशा चार रांगा लागल्या होत्या. नगरपंचायत व प्रशासनाच्यावतीने दर्शन रांगांमध्ये पाण्याची सोय
तसेच दर्शन रांगांवर छताचे आवरण टाकण्यात आले होते. त्यामुळे अन्हापासून भाविकांचा बचाव झाला. माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर
भाविकांच्या चेहच्यावर माऊलीच भेटल्याचे समाधान दिसत होते. माऊलींच्या बरोबरच माऊलींच्या रथाचे तसेच अश्वांचे भाविक दर्शन घेत
होते. यावेळी माऊलींचा पालखीतळ वारकरी व भाविकांनी गजबजून गेला. दोन दिवसांच्या मुक्काम काळात संपूर्ण लोणंद नगरी हरीनामाच्या
गजराने दुमदुमुन गेली होती. त्यामुळे अवध्या लोणंदनगरीला पंढरीचे स्वरूप आले होते.
सुयोग ग्रुप मार्फत पंच महाजन मंगल कार्यालय येथे जेवणाच्या हजारो पंगती बसल्या होत्या  
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली