आदर्श संकुलनात श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा.*
आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशु विहारआगाशिवनगर मध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा ५० वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. श्री मळाईदेवी व ब्रह्मीभूत गंगाधर वासुदेव चैतन्य महाराज .यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री.सोपान जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या कार्यकर्तुत्वाची यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सचिन शिंदे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन .संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेत .श्री मळाईदेवी शिष्यवृत्ती परीक्षा, नॉनव्हेविकल डे ,पर्यावरण पूरक बिजारोपण, वृक्षारोपण ,प्रदूषण मुक्त दिवाळी, रक्तदान शिबिर .या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
श्री.रफिक सुतार यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या क्रीडांगुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून संस्थेच्या व आदर्श क्रीडा संस्थेच्या माध्यमातून घेणाऱ्या येणाऱ्या विविध वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारां विषयी माहिती देत या खेळांमध्ये सहभागी होण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले.
श्री.वैभव शिर्के यांनी मळाई देवी शिक्षण संस्थेच्याविविध शाखांविषयी माहिती देत.श्री मळाई देवी शिक्षण संस्थेमध्ये ५००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून १५० हून अधिक शिक्षक वृंद ज्ञानार्जन करत असल्याचे सांगितले.
संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून .विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख - सौ.प्राजक्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून विविध गुणदर्शन अर्थात कला- नृत्य- अभिनय- नकला - गायन- वादन या कार्यक्रमाचे.आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा विद्यार्थी व पालकांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी नंदा पानवळ, शबाना मुल्ला,अश्विनी पाटील जयमाला पाटील,लता नलावडे रूपाली कुंभार ,अश्विनी यादव सुवर्ण पाटील, मेघा भाटे ,शितल भिसे ,संग्राम काकडे ,वैशाली शिंदे यांचे सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते..अशाप्रकारे मोठ्या उत्साहात श्रीमळाईदेवी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे सचिव मा.अशोकराव थोरात (भाऊ) अध्यक्ष-मा.पांडुरंग पाटील,उपाध्यक्ष-मा.भास्करराव पाटील,खजिनदार मा. तुळशीराम शिर्के.संचालक-मा.वसंतराव चव्हाण .संचालिका-मा.सौ डॉ.स्वाती थोरात .यांनी सर्व विद्यार्थी -पालक व शिक्षकांना संस्था वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रंजना कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ.अश्विनी पाटील यांनी मानले.
Comments
Post a Comment