पुढील सर्व निवडणूका EVM द्वारे न घेतल्यास EVM मशीन फोडणार. मानव कल्याणकारी संघटनेचे प्रांत सो,कराड यांना निवेदन.
*पुढील सर्व निवडणूका EVM द्वारे न घेतल्यास EVM मशीन फोडणार. मानव कल्याणकारी संघटनेचे प्रांत सो,कराड यांना निवेदन.
1950 साली जनता या देशाची मालक झाली. जनतेला मतदानाचा हक्क प्राप्त झाला. परंतु सध्याच्या निवडणुकांमध्ये लागलेल्या निकालावरुन e.v.m वर शंका निर्माण होत आहे. जनतेने दिलेले मत हे त्याच उमेद्वाराला जाते का याबाबत जनतेला संभ्रम आहे. त्यामुळे जनतेला संविधानाने दिलेला मताचा अधीकार धोक्यात आलेला असल्याने पुढील निवडणूका या ब्यालेट पेपर वर व्हाव्यात असे न झाल्यास मानव कल्याणकारी संघटना e.v.m मशीन फोडणार याबाबत व e.v.m बंद होण्यासाठी मा.बाबा आढाव यांनी केलेल्या आत्मक्लेश अंदोलनाला पाठींबा जाहीर करण्यासाठी प्रांत सो कराड यांना निवेदन देण्यात आले. *त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा.जावेदभाई नायकवडी, राज्य कार्यकारीणी सदस्य मा.अविनाश फुके, राज्य कार्यकारीणी सदस्य मा.रफीकभाई मुल्ला, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष मा.राजमहम्मद पठाण, सातारा जिल्हा संघटक मा.प्रकाश काळे, कराड तालुका अध्यक्ष मा.आयाज शेख, कराड शहर अध्यक्ष मा.समिर बागवान, कराड तालुका युवक अध्यक्ष मा.आसिफ पटेल, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा मा.कुसुमताई शेवाळे, जिल्हा उपाध्यक्षा मा.अर्चनाताई जाधव, कराड दक्षीण तालुका अध्यक्षा मा.दिपालीताई पुस्तके, कराड उत्तर तालुका अध्यक्षा मा.संगीताताई दुपटे, मा.इम्रान संदे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.*
Comments
Post a Comment