शिंदेवाडी - विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन

शिंदेवाडी - विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन
कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लाभार्थींना होणार साहित्य वितरण

कराड, ता. कराड वार्ता समूह १९ : भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिंदेवाडी – विंग येथे भव्य बांधकाम कामगार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना साहित्य वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोदंणीकृती बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य संच पेटीचे वितरण केले जाते. तसेच पात्र लाभार्थींना भांडी, तसेच बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. कराड दक्षिणमध्ये बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाजपा कामगार आघाडीच्या माध्यमातून अनेक पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी विशेष अभियानही राबविले जात आहे. 

या लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून साहित्याचे वितरण राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते या बांधकाम कामगार संमेलनात केले जाणार आहे. तसेच यावेळी बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरणही केले जाणार आहे. या कार्यक्रमाला कराड दक्षिणमधील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा कामगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष रुपेश देसाई यांनी केले आहे.

सोबत फोटो : 

ना. डॉ. सुरेश खाडे व डॉ. अतुल भोसले

Comments

Popular posts from this blog

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.

*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश " राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क