माऊली माऊलीच्या गजरात पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन* कराड वार्ता न्युज समूह

*माऊली माऊलीच्या गजरात पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन* कराड वार्ता न्युज समूह

*पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले पालखी सोहळ्याचे स्वागत*

सातारा, दि. ६, (जि.मा.का.)- माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्यात पाडेगाव, ता. खंडाळा येथे आगमन झाले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

यावेळी खासदार धैरशिल मोहिते - पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण,  आमदार संजय जगताप, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुण्याचे पोलीस अधिकारी पंकज देशमुख, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थामन अधिकारी देविदास ताम्हाणे, पालखी सोहळा विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

   यावेळी पालकमंत्री श्री देसाई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच पोलीस विभागाने पालखीला मानवंदना दिली. 
 
    पालखीच्या सातारा जिल्ह्यातील आगमन वेळी नीरा नदीत पादुकांचे स्नान संपन्न झाले. स्वागतानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. पालखी आज आणि उद्या लोणंद मुक्कामी असणार आहे. 

   चौकट 
पालखी सोहळ्या दरम्यान  पालकमंत्री श्री देसाई यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी फळ वाटप करण्यात आले. वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने या फळ वाटपाचा लाभ घेतला. 
०००००

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात