दिल्ली कराड वार्ता न्युज

दिल्ली कराड वार्ता न्युज 
भारत गौरव पुरस्काराने प्रा पै अमोल साठे सन्मानित 

नवी दिल्ली - दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड (Gov. Of Delhi ) आणी कालीरमण फाउंडेशन यांच्यावतीने हरितक्रांतीचे जनक सर छोटू राम यांचे स्मृती प्रित्यर्थ विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भारतातील 30 लोकांना भारत गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

.           इंडियन इस्लामिक कल्चरल  सेंटर, लोधी रोड नवी दिल्ली या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा,  खासदार जयंत चौधरी, सौरभ भारद्वाज आरोग्य मंत्री दिल्ली सरकार, माजी विधानसभा अध्यक्ष डॉ योगानंद शास्त्री, अध्यक्ष परदीप अग्रवाल दिल्ली पॅरा मेडिकल बोर्ड, उपमहापौर डॉ. आले इक्बाल तसेच u प चे DSP हिंदकेसरी जगदीश कालीरमण यांची प्रमुख उपस्थिती होती.

 भारतातून अनेक महान व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये कला क्रीडा तंत्रज्ञान शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय अशा महान व्यक्तींना भारत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात अंशू मलिक (कुस्ती, हरियाणा), मनू भाकर (नेमबाजी, हरियाणा), रजत रुहिल (हरियाणा), आशा नैन (हँडबॉल, हरियाणा), किरण बालियान (शॉटपुट, हरियाणा), अर्जुन देशवाल (कबड्डी, हरियाणा). संजय कालीरामन (हॉकी, हरियाणा), सुनील कुमार (कुस्ती, हरियाणा),  शिवानी गुप्ता (मिस इंडिया बॉडीबिल्डिंग, दिल्ली), सतीश (कुस्ती, हरियाणा), वसंतराव पाटील (क्रीडा प्रवर्तक, महाराष्ट्र), विजय नखाते (कुस्ती प्रशिक्षक आणि प्रवर्तक, महाराष्ट्र), प्रा अमोल साठे (बेल्ट रेसलिंग, महाराष्ट्र), मीनू कालीरामन (हरियाणा) गिर्यारोहण., पूजा शर्मा (हरियाणा),  पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
 म्हासोली तालुका कराड येथील आशियाई सुवर्णपदक विजेते प्रा पै अमोल साठे ( अध्यक्ष मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया, मार्गदर्शक कुस्ती कोच भोजलिंग कुस्ती केंद्र जांभुळणी तालुका माण )
 क्रीडा आणि समाजकार्याची दखल घेऊन भारत गौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले.
( रोख रक्कम 11 हजार रुपये, भारत गौरव सिम्बॉल, सलमानचिन्ह आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप होते )
.           काली रमण फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष adv सुरेंद्र कालिरमण (सुप्रीम कोर्ट ) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत गौरव पुरस्कार या सोहळ्याचे हे नववे (९ वे )वर्ष होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.