कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर*

*कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर* माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याने शासनाकडून निधी मंजूर *कराड:* येथील एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारिकरणांबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि, महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. या आ. चव्हाण यांच्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां...