मातोश्री ग्रुप माध्यमातून रुग्ण सेवा करणारे नवाजबाबा खरे आरोग्यदुत* - आ. निलेश लंके
*मातोश्री ग्रुप माध्यमातून रुग्ण सेवा करणारे नवाजबाबा खरे आरोग्यदुत* - आ. निलेश लंके
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
समाजात वेगवेगळ्या पद्धतीचे बहुउद्देशीय सामाजिक संघटना कार्यरत असतात यामधे अनेक संस्था या आपल्या संघटनांमार्फत विविध उत्सव साजरा करतात परंतू आज समाजात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्य असुन याबाबत समस्या सोडविण्यासाठी विविध प्रतिष्ठाण, फाउंडेशन आदी सामाजिक संघटनांनी कराडच्या मातोश्री ग्रुपचा आदर्श घेऊन आरोग्य व रुग्ण सेवेकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, गेले तेरा वर्षांपासून मातोश्री ग्रुपचे वतीने गरजु गोरगरीबांना मोफत आरोग्य सेवा देणारे नवाजबाबा सुतार हे खरे आरोग्यदुत आहेत असे गौरवोद्गार पारनेरचे आमदार कोविड योद्धा आदरणीय निलेश लंके साहेब यांनी व्यक्त केले, कराड शहरातील आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मातोश्री ग्रुप च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मातोश्री क्लिनिक कन्सल्टिंग सेंटरच्या दुसऱ्या शाखेचे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. सहकार मंत्री व कराड उत्तर चे लोकप्रिय आमदार आदरणीय माननीय बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते व पारनेरचे आमदार कोविड योद्धा आदरणीय निलेश लंके साहेब यांच्या उपस्थितीत मातोश्री ग्रुप च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मातोश्री क्लिनिक कन्सल्टिंग सेंटरच्या दुसऱ्या शाखेचे शुभारंभ करण्यात आले.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मातोश्री ग्रुपच्या सुरू असणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कामाचे भरभरुन कौतुक केले.
याप्रसंगी दक्ष कराडकर ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बापू पाटील, मनसेचे नेते दादासाहेब शिंगण, आमचे आधारस्तंभ अख्तर भाई आंबेकरी, युवा नेते प्रवीण पवार, युवा नेते शिवराज इंगोले, माजी नगरसेवक महेश कांबळे, दिलीप दादा घोडके, युवा नेते मुसद्दीक आंबेकरी, समाजसेवक प्रसाद पावसकर दादा, युवा नेते जावेद भाई नायकवडी, सैफ आतार, अभिजीत सूर्यवंशी, एनडी इनामदार, रफिक मोमीन, युवा नेते यासीन आतार, रहेबर ए जरिया फाउंडेशनचे वसीम शेख, अमीर साहब रमजान भाई मांगले कर, रियाज भाई आतार, कादर भाई नायकवडी, महेश पाटील, युवा नेते शोहेब भाई संदे, जब्बार शेख, डॉ.अनुश्री सुर्वे, डॉ. सोनाली थोरात, डॉ.अश्विनी सुपणेकर, डॉ.ऋतुजा थोरात, डॉ. मिलिंद पाटील, तोफिक मोमीन, महानंद काटेर, रोहित भोसले, अजित भोसले, गणेश खिल्लारे, चांदसाहेब निशाणदार नवाज इसाक सुतार, आसिफ भाई इबुशे, इमरान भाई मुजावर इतर परिसरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित असणारे सर्वांचे मातोश्री ग्रुपचे अध्यक्ष नवाज सुतार यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment