Posts

Showing posts from November, 2025

वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील यांचा प्रचाराचा धडाका

Image
*वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील यांचा प्रचाराचा धडाका*   *कराड* : वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव (आप्पा) पाटील यांनी प्रचाराची जोरदार धडाकेबाज तयारी सुरू केली आहे. दिवाळी सणानिमित्त त्यांनी गटातील सुमारे साडेआठ हजार कुटुंबांपर्यंत जाऊन दिवाळी किटचे वाटप केले. सामाजिक दृष्टिकोन ठेवून राजकारणात सक्रिय असलेले नामदेवराव आप्पा पाटील हे दूरदृष्टी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. वारुंजी पंचायत समिती सदस्य असताना गणातील प्रत्येक गावात त्यांचा थेट संपर्क असून, समाजकार्यास प्राधान्य देणारे कार्य हेच त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास झालेला आहे. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणून स्थानिक विकासाला चालना दिली आहे. नामदेवराव आप्पा पाटील म्हणाले, “कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास हा आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून झ...

कराड नगरपालिका निवडणुकीत संघर्ष योद्धा मैदानात

Image
कराड नगरपालिका निवडणुकीत संघर्ष योद्धा मैदानात कराड नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राजेद्रसिह यादव यांच्या नावाची घोषणा  उपमुख्यमंत्री एकनाथ gvशिंदे यांच्या शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वय व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या नावाची पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या मेळ्यात घोषणा करण्यात आले आहे आज कराड येथे शिवसेना यशवंत विकास आघाडी यांच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मोठी गर्दी पाहायला मिळाली या मेळाव्यात राजेंद्रसिंह यादव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तसेच राजेद्रसिह यादव यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांच्या कडून करण्यात आले या मागणीला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रतिसाद दिला गेल्या एक महिन्यापासून यशवंत विकास आघाडी नेते राजेंद्रसिंह यादव काय निर्णय घेणार याकडे कराड शहरवासी यांचे लक्ष वेधून राहिले होते मात्र आता याला पूर्णविराम मिळाला आहे अखेर राजेंद्रसिंह यादव हे शिवसेना व यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून कराड नगरपाल...

शिवसेना व यशवंत आघाडीच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.*

Image
*शिवसेना व यशवंत आघाडीच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.* शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष मा.राजेंद्रसिह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी पक्षाचे  पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना व यशवंत विकास आघाडीची कराड नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत भुमिका ठरविण्यात येणार आहे.या मेळाव्याला शिवसेना जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार नगरसेवक हणमंत पवार,विजय वाटेगावकर,प्रीतम यादव,निशांत ढेकळे,गजेंद्र कांबळे,ओमकार मुळे,बाळासाहेब यादव,राहुल खराडे,विनोद भोसले, किरण पाटील,माजी नगराध्यक्षा सौ.संगिता देसाई,आनंदराव देसाई, सचिन पाटील,विजयसिह यादव शहर प्रमुख राजेंद्र माने महिला आघाडी उपजिल्हा सुलोचना पवार चांदनी ताई पवार शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवार दि ९ नोव्हेंबर रोजी सायं.५ वा.सारडा लाॅन्स,पंतांचा कोट, सोमवार पेठ कराड येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.