विद्यार्थ्यांनी इप्सित साध्य करण्यासाठी कटिबद्ध व्हावे. - मा.अभिजीत इंगळे कराड वार्ता न्युज
विद्यार्थ्यांनी इप्सित साध्य करण्यासाठी कटिबद्ध व्हावे.
- मा.अभिजीत इंगळे कराड वार्ता न्युज
सैदापूर विद्यानगर येथे समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयामध्ये ग्रंथालयाचे सन्माननीय सभासद धनाजी आनंदा मोहिते व संदीप शामराव शेळके यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल ग्रंथालयाचे सन्माननीय संचालक अभिजीत इंगळे यांचे हस्ते ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी अभिजीत इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी इप्सित साध्य करण्यासाठी कटिबद्ध व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. सत्कार प्रसंगी धनाजी मोहिते म्हणाले, माझ्या यशामध्ये गोखले ग्रंथालयाचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या ग्रंथालयाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली . याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना संदीप शेळके म्हणाले, पुस्तकेच खऱ्या अर्थाने आयुष्य घडवतात आज हे यश मिळाले आहे . ते ग्रंथालयामुळेच. आम्ही घडलो असे अनेक विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा लाभ घ्यावा आम्ही या ग्रंथालयासाठी सर्वार्थाने सहकार्य करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी ग्रंथालयाचे सभासद कविता घोरपडे, रेश्मा कसबे ,सीमा कांबळे , ऋतुजा देवकुळे तसेच ग्रंथालयाचे सभासद, वाचक उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मानले.
Comments
Post a Comment