*मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य *-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*कराड वार्ता न्युज
*मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य *-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी* # *राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात* # *स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – फडणवीस* # *संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी - तारा भवाळकर* नवी दिल्ली दि.21 : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले. नवी दिल्लीतील विज्ञान...