कराड- सैदापूर विद्यानगर येथे, समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयामध्ये बाबुरावजी गोखले यांचा स्मृतिदिन साजरा

कराड-  सैदापूर विद्यानगर येथे, समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयामध्ये बाबुरावजी गोखले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र प्रभुणे साहेब म्हणाले, बाबुरावजी गोखले हे एक सत्य समाजसेवक तसेच ग्रंथालय चळवळीतील मोठे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कार्याचा वसा घेऊन सुशिक्षित नागरिकांनी ग्रंथ संगती वाढवावी आणि तरुण पिढीने आपले योगदान द्यावे त्यामुळे भविष्यकालीन समाज जीवन सांस्कृतिक दृष्ट्या आरोग्यदायी होईल. त्याच प्रसंगी ग्रंथालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे यांनी बाबुरावजी गोखले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सैदापूर गावचे मा. जीवन जाधव, अशोक मुळीक, शिवाजी जाधव, सीमा कांबळे, ऋतुजा देवकुळे, शंकर काशीद, सिद्धाप्पा कापसे, प्रणाली शेळके, जे. ए .कांबळे तसेच ग्रंथालयाचे सभासद वाचक उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मानले.न्युज कराड वार्ता

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक