*दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीटी मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा*

*दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीटी मालिका सुरु*
*शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा*
                सातारा दि.31 : दुचाकी वाहनासाठी डीटी  ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 1 जानेवारी 2025 रोजी प्रादेशिक  परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील.  दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे  प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
1 जानेवारी 2025 ऑक्टोबर रोजी चारचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील.   3 जानेवारी 2025 रोजी दुचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील.   ज्या आकर्षक  कमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्या अर्जदारास त्याच दिवशी आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल.  एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येतील.   आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.
                                                                                0000

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त