केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोफ शुक्रवारी विंगमध्ये धडाडणार
भाजपा- महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन
कराड, ता. ६ : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री ना. अमित शाह शुक्रवारी (ता. ८) कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. विंग येथील आदर्श विद्यामंदिराच्या भव्य पटांगणावर ना. अमित शाह यांची तोफ धडाडणार आहे.
राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळीला जोरदार प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री ना. अमित शाह, केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका महाराष्ट्रात सुरु होत आहे. याअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह यांची कराड येथे भव्य प्रचार सभा होत आहे.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. व मित्रपक्षांच्या महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ विंग (ता. कराड) येथील आदर्श विद्यामंदिराच्या पटांगणावर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह उपस्थितांना संबोधित करणार आहेत. याप्रसंगी सभेच्या व्यासपीठावर जिल्ह्यातील विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती असणार आहे. या सभेला कार्यकर्ते, नागरिक, मतदार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी केले आहे.
फोटो : ना. अमित शाह
Comments
Post a Comment