कराड - सैदापूर विद्यानगर येथे समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयांमध्ये बाबुरावजी गोखले यांचा जन्मदिन

कराड - सैदापूर विद्यानगर येथे समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयांमध्ये बाबुरावजी गोखले यांचा जन्मदिन तसेच शीख धर्म संस्थापक गुरुनानक यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष कांचन धर्मे  म्हणाल्या, बाबुराव गोखले हे ग्रंथालय चळवळीतील फार मोठे व्यक्तिमत्व होते. ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून गाव तिथे ग्रंथालय निर्माण झाले परंतु ही चळवळ  बाबुरावजी गोखले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून खेडोपाडी पोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले .त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये त्यांनी केलेले प्रबोधनाचे कार्य प्रेरणादायी आहे. त्याच प्रसंगी संचालक अभिजीत इंगळे यांनी  आपले मनोगत  व्यक्त केले.  ते म्हणाले गुरुनानक हे केवळ धर्मगुरू नव्हते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. ते तत्त्वज्ञ, कवी, समाज सुधारक, संगीत तज्ञ, देशभक्त होते.  त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. गुरुनानक यांची शिकवण त्यांच्या शिष्यापूर्ती शीख धर्मापूर्ती मर्यादित नव्हती सर्व मानव जातीसाठी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे संचालक प्रा.उमेश नाथ  यांनी केले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. शरद जाधव, दिपाली  जाधव, सीमा कांबळे ग्रंथालयाचे सभासद, वाचक उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त