Posts

Showing posts from November, 2024

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

Image
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचे स्वरुप समजावून घेतले. तसेच मतदारसंघातील विविध नागरी समस्या तातडीने सोडविण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना आ. डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रशासनाला दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून स्वत:चे पक्के घर मिळविणे हा या नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे येत्या ५ वर्षात एकही माणूस झोपडपट्टीत न राहता, त्याला स्वत:चे हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्याची ग्वाही आ.डॉ. भोसले यांनी दिली.  आ.डॉ. भोसले पुढे म्हणाले, कराड शहर हे देशाच्या नकाशावर सर्वांत देखणे शहर म्हणून नावारुपाला आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने शहराचा...

कराड : वार्ता ब्रेकिंग न्युज 260, कराड दक्षिण मतदार संघाच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण

Image
कराड : वार्ता ब्रेकिंग न्युज  260, कराड दक्षिण मतदार संघाच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून त्रिस्तरीय तपासणी होऊनच मतदान मोजणी कक्षाकडे ओळखपत्र असणाऱ्यांनाच सोडण्यात येईल, त्याचबरोबर कॅमेरा, मोबाईल, इलेक्ट्रिक वस्तू आतमध्ये आणता येणार नाहीत अशी माहिती, 260 कराड दक्षिण चे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मतमोजणी अनुषंगाने आयोजित नियोजन बैठकीत दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस एस पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, नायब तहसीलदार विश्वजीतसिंह राजपूत, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील, प्रांत कार्यालयाचे गोपाल वसू, प्रकाश नागरगोजे, नोडल अधिकारी प्रमोद मोटे, मीडिया कम्युनिकेशनचे दिलीप माने उपस्थित होते. मतदान मोजणी अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आत्तापर्यंत सर्वांच्या सहकार्याने गेली दोन महिने राबविलेली मोहीम यशस्वी झाली आहे. आता मतमोजणीची शेवटची मोहीम फत्ते करूया. मतमो...

कराड - सैदापूर विद्यानगर येथे समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयांमध्ये बाबुरावजी गोखले यांचा जन्मदिन

Image
कराड - सैदापूर विद्यानगर येथे समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयांमध्ये बाबुरावजी गोखले यांचा जन्मदिन तसेच शीख धर्म संस्थापक गुरुनानक यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष कांचन धर्मे  म्हणाल्या, बाबुराव गोखले हे ग्रंथालय चळवळीतील फार मोठे व्यक्तिमत्व होते. ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून गाव तिथे ग्रंथालय निर्माण झाले परंतु ही चळवळ  बाबुरावजी गोखले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून खेडोपाडी पोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले .त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये त्यांनी केलेले प्रबोधनाचे कार्य प्रेरणादायी आहे. त्याच प्रसंगी संचालक अभिजीत इंगळे यांनी  आपले मनोगत  व्यक्त केले.  ते म्हणाले गुरुनानक हे केवळ धर्मगुरू नव्हते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. ते तत्त्वज्ञ, कवी, समाज सुधारक, संगीत तज्ञ, देशभक्त होते.  त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. गुरुनानक यांची शिकवण त्यांच्या शिष्यापूर्ती शीख धर्मापूर्ती मर्यादित नव्हती सर्व मानव जातीसाठी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे संचालक प्रा.उमेश नाथ...

कराड नगरपालिकेत पाच वर्षे सत्ता हातात असताना भाजपने कोणतेही विकास काम केले नाही भाजपने नगरपालिका

Image
कराड नगरपालिकेत पाच वर्षे सत्ता हातात असताना भाजपने कोणतेही विकास काम केले नाही भाजपने नगरपालिका निवडणुकीत शब्द नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामधील एकही विकासकाम केले नसल्याने त्यांच्याच आवाहन नुसार भाजप उमेदवाराला मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजपने पाच वर्ष सत्ता भोगली मात्र विकास कामे काहीच केलेली नाहीत. हे कशाच्या आधारे सांगत आहोत तर कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजप कडून व अतुल भोसले यांच्याकडून जो 'शब्द' नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला होता. त्याची कोणतीही अंमलबजावणी केली नाही. पाच वर्षे भाजपची सत्ता असून सुद्धा कोणतीही विकासकामे कराड शहरात केली गेली नाहीत. त्यामुळे त्यांनीच निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द नामाप्रमाणे विकास तू केला नाही शब्दही पाळला नाही, *त्याच शब्दनाम्यात विकास केला नाही तर मत मागायला येणार नाही असे आश्वासन* देणारे भाजपचे उमेदवार विधानसभेला मात्र लोकांपुढे मत मागण्यासाठी जात आहेत, कराडकरांना दिलेला शब्द च ज्यांनी पाळला नाही त्यांना कोणताही कराडकरांकडे मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. असा घणाघाती आरोप प्रद...

विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ.कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा

Image
कराड, प्रतिनिधी :  विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ.कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले. मनोज जरांगे - पाटील यांच्या आदेशावरून सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मराठा समाजाने पाठिंबा दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, जिल्हा सरचिटणीस विवेक कुराडे - पाटील, सुरज जाधव, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष युवराज कुराडे - पाटील, कराड शहराध्यक्ष संदीप काळे, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय शिंदे, अमर पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मराठा समाजाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला. यावेळेस विधानसभेत आ. चव्हाण यांनी आरक्षणाची आपली भूमिका ठामपणे मांडली. आरक्षणासाठ...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात मोठी ताकद

Image
 *कराड* : पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप मोठी ताकद आहे, . त्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहे. त्यांची ओळख सांगावी आणि आपला अभिमान वाढवावा, असे हे नेतृत्व आहे. समोरच्या उमेदवाराची पार्श्वभूमी तुम्ही जाणून आहात. त्यांच्याकडे स्वकर्तृत्व सांगण्यासारखे काहीच नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मताच्या रूपाने पाऊस पाडून उभे रहा. विरोधात पैसे पसरणाऱ्यांचा कंडका पाडा. असा कोल्हापूरी रांगडी भाषेत माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी घणाघात केला. कराडमधील विठ्ठल चौक व आंबेडकर चौकात झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रभारी प्रकाश नहाटा, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खा. चंद्रकांत हंडोरे, अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, शशिराज करपे, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण,  कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, विठ्ठल शिखरे, अमित जाधव, अशोकराव पाटील, प्रदीप ज...

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी मलकापुरात जाहीर सभा

Image
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी मलकापुरात जाहीर सभा कराड, ता. १४ : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. व मित्रपक्षांच्या महायुतीचे कराड दक्षिणमधील अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर (ता. कराड) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मलकापुरातील बैल बाजार रोडवरील श्री गणपती मंदिरामागील भव्य पटांगणावर ही सभा होणार आहे.  विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा – महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आघाडी घेत, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांच्या माध्यमातून प्रचाराचे रान चांगलेच तापविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नुकतीच विंग (ता. कराड) येथे केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह यांची अलोट गर्दीत जाहीर प्रचार सभा पार पडली. त्यानंतर आता मलकापूर (ता. कराड) येथे शुक्रवारी (ता. १५) सकाळी ११.३० वाजता उप...

आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव यांचा जाहीर पाठिंबा

Image
*आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव यांचा जाहीर पाठिंबा  *कराड* : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाआघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूर (ता. कराड) गावचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव व सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव व सर्व संचालकांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी ज्येष्ठ नेते धनाजीराव जाधव (आण्णा) व मानसिंगराव जाधव (नाना) यांची प्रमुख उपस्थिती होती.  सैदापूर येथे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करत सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला. स्वच्छ आणि निष्कलंक चेहरा म्हणून आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा देशभरात लौकिक आहे. त्यांना पूर्ण ताकदीने निवडून आणण्याचा निश्चय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने केला आहे.  आ. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कराड आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या कृतिशील कार्यातून कराडला जोडणारे रस्ते केल्यामुळे विकासाला मोठी गती आली. रस्त्यांच्या जाळ्यामुळे परिसराचे नंदनवन झाले....

कराड शहरात माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधला

Image
कराड शहरात माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधला  *कराड* : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या भेटीच्या दौऱ्यात त्यांनी व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी देत संवाद साधला. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दौऱ्यात कराडमधील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत बाबांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार केला. यावेळी शहरातील सुज्ञ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला विकास प्रत्यक्ष डोळ्याने दिसत आहे. मात्र विरोधकांनी विकासाची केवळ पोस्टरबाजी केली आहे. त्यांच्या ढोंगीपणाला न भुलता पृथ्वीराज बाबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवूया, असा निर्धार ठिकठिकाणच्या भेटी दरम्यान नागरिकांनी केला.  राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांगी...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोफ शुक्रवारी विंगमध्ये धडाडणार

Image
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोफ शुक्रवारी विंगमध्ये धडाडणार भाजपा- महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन कराड, ता. ६ : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री ना. अमित शाह शुक्रवारी (ता. ८) कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. विंग येथील आदर्श विद्यामंदिराच्या भव्य पटांगणावर ना. अमित शाह यांची तोफ धडाडणार आहे. राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळीला जोरदार प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री ना. अमित शाह, केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका महाराष्ट्रात सुरु होत आहे. याअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह यांची कराड येथे भव्य प्रचार सभा होत आहे.  भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. व मित्रपक्षांच्या महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ विंग (ता. कराड) येथील आदर्श विद्यामंदिराच्या पटांगणावर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत केंद्रीय गृहमंत्...

कराड* : मुंढे (ता. कराड) येथील सरपंच मनिषा संभाजी जमाले व सदस्या विशाखा लोंढे यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश

Image
 *कराड* : मुंढे (ता. कराड) येथील सरपंच मनिषा संभाजी जमाले व सदस्या विशाखा लोंढे यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. एका कार्यक्रमात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, आनंदराव घोडके, माजी उपसरपंच शिवाजीराव जमाले, सुषमा जमाले, पांडुरंग जमाले, भीमराव जमाले, शिवाजी जमाले, आण्णासाहेब जमाले, संभाजी जमाले, विकास लोंढे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बडेकर, पूजा जांभळे, आनंदा जमाले, दत्तात्रय माळी, पूनम जमाले, अमजद मुल्ला, प्रल्हाद वाघमारे, सतीश जमाले, अनिकेत चव्हाण, अधिक सावंत, गणेश पवार, दिग्विजय जमाले उपस्थित होते. दरम्यान आ. चव्हाण यांनी नुरानी मोहला येथेही भेट दिली. यावेळी संस्थापक अध्यक्ष अफजल बागवान, गणेश पवार, अध्यक्ष आरबाज मोमीन, अदनान बागवान, शाहबाज मोकाशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. --------------------------------------- फोटो ओळ मुंढे : सरपंच मनिषा जमाले व सदस्या विशाखा लोंढे यांच...