आदरणीय पी डी पाटील साहेब सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित गोवारे

आदरणीय पी डी पाटील साहेब सहकारी  गृहनिर्माण संस्था मर्यादित  गोवारे मधील अंतर्गत  रस्ते व ओपन स्पेस विकसित करणे साठी कोयना भूकंप निधी मधून माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील साहेब, माजी सहकार व पणन मंत्री तथा पालक मंत्री सातारा जिल्हा यांच्या विशेष प्रयत्नातून रक्कम रुपये 30 लक्ष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व सभासद यांनी माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील साहेब यांचे समक्ष भेटून आभार मानले व साहेबांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री एम एच  पाटील,ज्येष्ठ संचालक आर डी भालदार, भीमराव पाटील,सुनील वडगावकर, सदस्य अशोक पालेकर, अशोक डबीर,आत्माराम कांबळे, एम बी  पवार व  सचिव मच्छिंद्र कुंभार आदी उपस्थित होते. सदरील निधी उपलब्ध करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे व लोकशाही आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री  जयंत काका पाटील यांनीही विशेष प्रयत्न व मार्गदर्शन  केले. त्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात