कराड दक्षिणसाठी ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर* आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून आला



 *कराड दक्षिणसाठी ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर* 
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून आला निधी ; मतदारसंघातील विविध विकासकामे होणार.


 *कराड* : कराड वार्ता समूह 
राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर होत त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदरच्या निधीतून ५६ विकासकामे होणार असून, राज्यातील विरोधी सरकारच्या काळातही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघात विकासकामांचा सिलसिला कायम राखला असल्याचे यातून अधोरेखित होत आहे. 

गेल्याच आठवड्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध विकासकामांसाठी ४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. तोच आता त्यांनी नुकताच कोयना भूकंप पुनर्वसन समितीअंतर्गत निधीतून ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आणला आहे. गेल्या पाच वर्षात आ. चव्हाण यांच्या माध्यमातून तालुक्यात ५५० कोटी रुपयांचा निधी आला आहे. एखादे विकासकाम मंजूर करणेपासून त्यासाठी निधीची प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही. तोपर्यंत आ. चव्हाण यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असतो. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी व प्रत्यक्ष विकास करणारी प्रतिमा म्हणून आ. चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते.

त्यांनी कृष्णाकाठी कोडोली व रेठरे बुद्रुक येथे कृष्णा नदीवर महत्वाकांक्षी पुल उभारणीसाठी सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्या पुलांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. या दोन्ही पुलांचा परिसरातील साखर कारखान्यांना ऊस वाहतुकीसाठी उपयोग होणार आहे. तसेच कोडोली येथील पुलामुळे कराड शहरातील वाहतुकीचा ताण कमी होवून परिसरातील आर्थिक विकासाला फायदा होणार आहे. 

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले असल्याने त्यांना राज्यातील प्रशासनाचा गाडा अभ्यास आहे. त्यामुळे शासनाच्या विविध प्रकारच्या निधीतून कराड दक्षिणेचा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. याचाच एक भाग म्हणून शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाने कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून कराड दक्षिणसाठी ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मिळविण्यात त्यांना यश आले आहे. या निधीच्या तरतुदीसाठी प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या निधीतून तालुक्यातील विविध गावातील ५६ विकासकामांचा समावेश झाला आहे. या निधीतून रस्ते काँक्रिटीकरण, खडीकरण, गटर्स, संरक्षक भिंत, मंदिर सभामंडप, रस्ता डांबरीकरण आदी कामे होणार आहेत.
-----------------------------------
चौकट

वाठार ते रेठरे बुद्रुक या रस्त्यावर वाठार व रेठरे खुर्द गावच्या हद्दीवर रस्त्याकडेस असणारा नाला मुजला असल्याने पावसाळ्यात सभोवतीच्या शिवारातील पाणी रस्त्यावर येवून मुख्य रस्ता पाण्याखाली जायचा. तसेच तेथील लोकवस्तीत पाणी शिरल्याने मोठी समस्या उभी राहायची. हा प्रश्न अनेक दिवसांपासून सुटलेला नव्हता. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नाकडे लक्ष देत त्या रस्त्यालगतच्या लालासाहेब बाजीराव पाटील ते अभिजित सुभाष पाटील यांच्या घरापर्यंत ते दक्षिण मांड नदीपर्यंत बंदिस्त पाईपलाइन करणेसाठी २० लाख रुपयांचा निधी प्राप्त केला आहे.
-----------------------------------

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक