गोखले ग्रंथालयात स्व.डॉ. सुमन पाटील यांचा स्मृतिदिन.
कराड :-कराड वार्ता न्युज समूह विद्यानगर सैदापूर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात नुकताच ग्रंथालयाचे संस्थापक, मार्गदर्शक डॉ. सुमन पाटील यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.बाजीराव पाटील संस्थापक लिगाडे पाटील ज्युनिअर कॉलेज सैदापूर तसेच मा.सौ वैशाली संजय जाधव अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सातारा जिल्हा उपस्थित होत्या .
याप्रसंगी बोलताना प्रा. बाजीराव पाटील यांनी यथोचित शब्दात सुमन पाटील यांच्या कार्याचा सन्मान केला. ते म्हणाले पाटील मॅडम यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा वसा सैदापूर गावच्या लोकांनी पुढे चालू ठेवला आहे. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. त्याप्रसंगी वैशाली जाधव यांनी पाटील मॅडम च्या अनेक आठवणी सांगितल्या. तसेच प्रमुख पाहुणे बाजीराव पाटील यांच्या हस्ते ग्रंथालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये मनोज गुप्ता पीएसआय, दिव्या जाधव वनरक्षक अधिकारी, कोमल ठोंबरे सातारा पोलीस, धनाजी मोहिते लिपिक पदी नियुक्ती, स्नेहल कुंभार कर सहाय्यक जीएसटी भवन मुंबई , ऐश्वर्या कांबळे सहाय्यक अभियंता, नितीन कणसे चेअरमन प्रीतीसंगम बँक कराड, प्रांजल जाधव यांत्रिक अभियंता, यांचा ग्रंथ भेट व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. नितेश जाधव ग्रामपंचायत सदस्य सैदापूर, श्री. सुनील जाधव, श्री.तानाजी माळी, श्री.धनाजी जाधव, श्री.पांडुरंग जाधव , श्री.राजेश गवळी. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. उमेश नाथ व पाहुण्यांचे स्वागत ग्रंथालयाचे अध्यक्ष कांचन धर्मे यांनी केले .
या कार्यक्रमास ग्रंथालयाचे संचालक मा. अभिजीत इंगळे, मा. सुनीता जाधव, ग्रंथपाल रुकसाना नदाफ सीमा कांबळे तसेच ग्रंथालयाचे सभासद ,वाचक, परिसरातील नागरिक उपस्थित होते. आभार ग्रंथालयाचे संचालक मा. प्रा.टी एच ऐवले यांनी मानले.
Comments
Post a Comment