स्वर्गीय पी. डी. पाटील साहेब यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी* कराड वार्ता न्युज

*स्वर्गीय पी. डी. पाटील साहेब यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी*
    *प्रा.दादाराम साळुंखे* कराड विद्यानगर:- येथील समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालय विद्यानगर सैदापूर येथे स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना प्रा. दादाराम साळुंखे म्हणाले, "स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब यांना कराड नगरीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अनेक वर्षे ते कराड नगरीचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.कराड व पंचक्रोशीतील लोकांसाठी कराडमध्ये भव्य ग्रंथालय तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची समाधी कराड येथील प्रीतीसंगमावर उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भविष्य काळाची दृष्टी लाभलेली एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे."
          यावेळी जेष्ठ नागरिक महादेव कांबळे यांनी  ग्रंथालयास ग्रंथ भेट दिली. यावेळी ग्रंथालयाचे संचालक अभिजीत इंगळे, सौ सुनिता जाधव, प्राजक्ता किराणे, पंकज सावंत, सीमा कांबळे उपस्थित होत्या. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक