कृष्णामाई घाटावर रविवारी महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण

कृष्णामाई घाटावर रविवारी महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण

कराड, ता. १४ : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित दरबार, वाखाण रोड – कराड आणि डॉ. अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथील श्री कृष्णामाई घाटावर रविवारी (ता. १५) सायंकाळी ४.३० वाजता महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते आणि स्वराजरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक सामितीचे संस्थापक सचिव रणजीत पाटील व माजी नगरसेवक सुहास जगताप यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात