डॉ.रमेश दिनकर चव्हाण यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य दीपस्तंभा सारखे आहे.
प्रा. दादाराम साळुंखे
कराड (कराड वार्ता न्युज समूह:-) विद्यानगर- येथील समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालय सैदापूर तालुका कराड यांच्यावतीने ओंड येथील पंडित गोविंद वल्लभ पंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश चव्हाण यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी मिळाली याबद्दल त्यांचा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्रा. दादाराम साळुंखे म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्राचार्य रमेश चव्हाण यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. बहुजन समाजातील गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश वाटप ग्रंथांचे वाटप ते करीत असतात. नुकतीच त्यांना आशिया वेदिक कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी तामिळनाडू यांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. यावेळी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामवंत उपस्थित होते डॉ. रमेश चव्हाण यांचे कार्य समाजातील दीपस्तंभा सारखे आहे.
यावेळी बोलताना डॉ. रमेश चव्हाण म्हणाले ,माझ्यावर समाजाने दाखवलेला विश्वास येथून पुढे सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच गरीब व अनाथ विद्यार्थ्यांनाही मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
याप्रसंगी ग्रंथालयाचे संचालक अभिजीत इंगळे , ॲड. राजा घाडगे, सीमा कांबळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश माने ,आकाश लोहार, यशवंत कांबळे, प्रशांत रेळेकर तसेच वाचक, सभासद उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मांनले.
Comments
Post a Comment