‘कृष्णा नर्सिंग’मध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

‘कृष्णा नर्सिंग’मध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद 
कराड, ता. ८ : कराड वार्ता न्युज 
येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेसमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. पुणे येथील सुप्रसिद्ध आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स पदाच्या भरतीसाठी या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या नर्सिंग डायरेक्टर मिनी नायर, वरिष्ठ मनुष्यबळ अधिकारी सुमित मुखर्जी, नर्स एज्युकेटर लिनाक्षी के., अभिषेक चव्हाण प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नर्सिंग पदवी व पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींची स्टाफ नर्स पदासाठी लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात आली.

याप्रसंगी बोलताना कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते म्हणाल्या, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९८३ साली कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली. आप्पासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा आज कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाला आहे. सद्य:स्थितीत कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये जी.एन.एम. नर्सिंग, बी.एससी. नर्सिंग, पोस्ट बी.एससी. नर्सिंग, नर्स प्रॅक्टिशनर इन क्रिटीकल केअर, एम.एससी. नर्सिंगसह पी.एचडी. अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. विशेषत: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या संस्थेमुळे नर्सिंग शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. या संस्थेत शिक्षण घेतलेले दोन हजारहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी ब्रिटन, आखाती देशांसह देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. आदित्य बिर्ला हॉस्पिटलने नर्सिंग स्टाफच्या भरतीसाठी कृष्णा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन, या महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रशंसा केली आहे.

याप्रसंगी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. मंदार माळवदे, सहसमन्वयक तेजस भोसले, आफसाना मुल्ला यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी :

कराड :  कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेसमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना डॉ. वैशाली मोहिते व अन्य मान्यवर.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक