आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सह्याद्रि कारखाना कार्यस्थळावर बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी जंगी कुस्त्यांचे खुले मैदान
आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सह्याद्रि कारखाना कार्यस्थळावर बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी जंगी कुस्त्यांचे खुले मैदान
कराड वार्ता प्रतिनिधी - कराड वार्ता न्युज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवार दिनांक 11 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 2.00 वाजता रोख पारितोषिकाच्या जंगी कुस्त्यांचे खुले मैदान सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील कुस्ती आखाड्यात आयोजित करण्यात आले आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील तरुणांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि होतकरू पैलवानांना संधी मिळावी यासाठी आदरणीय स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांनी कारखाना कार्यस्थळावर सन १९८१ पासून गणेशोत्सव काळामध्ये वजनगटानुसार वार्षिक मानधनावरील ऑलम्पिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धा व रोख पारितोषिकाच्या जंगी कुस्त्यांचे खुले मैदान भरवण्यास सुरुवात केली होती, तद्नंतर कारखान्याचे चेअरमन, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने मैदान भरविण्याची परंपरा सुरू ठेवली असून, सदरचे मैदान आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरविण्यात येते.
दरम्यान रविवार दिनांक 8 आणि 9 सप्टेंबर रोजी वार्षिक मानधनावरील वजनगटानुसार ऑलम्पिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धेस सुरूवात झाली आहे. व रोख पारितोषिकाच्या जंगी कुस्त्यांचे खुले मैदान बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता आयोजित करण्यात आले आहे, कुस्तीमैदानास पावसामुळे व्यत्यय येऊ नये म्हणुन कारखान्याचे संचालक जशराज पाटील (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती आखाड्यास पत्र्याचा मंडप घालण्यात आला आहे. तसेच कुस्ती शौकीनांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मैदानामध्ये उपमहाराष्ट्र केसरी पै.प्रकाश बनकर विरूद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड, महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर विरूद्ध पै.माऊली कोकाटे, पै.किरण भगत विरूद्ध पै.आशिष हुड्डा, पै.रविराज चव्हाण विरूद्ध पै. बिन्ना, पै. दादा शेळके विरूद्ध मुन्ना झुर्जुके, पै.सुबोध पाटील विरूद्ध पै.वैभव माने, पै.प्रशांत शिंदे विरूद्ध पै.महारूद्र काळे यासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांच्या असंख्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सह्याद्रि कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक मानधनावरील वजनगटानुसार ऑलम्पिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धा व रोख पारितोषिकाच्या जंगी कुस्त्यांच्या खुल्या मैदानासाठी होतकरू पैलवानांनी आणि कुस्ती शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment