Posts

Showing posts from September, 2024

शिंदेवाडी - विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन

Image
शिंदेवाडी - विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लाभार्थींना होणार साहित्य वितरण कराड, ता. कराड वार्ता समूह १९ : भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिंदेवाडी – विंग येथे भव्य बांधकाम कामगार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना साहित्य वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार आहेत.  बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोदंणीकृती बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य संच पेटीचे वितरण केले जाते. तसेच पात्र लाभार्थींना भांडी, तसेच बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. कराड दक्षिणमध्ये बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाजपा कामगार आघाडीच्या माध्यमातून अनेक पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी विशे

कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव

कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव स्वरसंस्कार म्युझिक अकॅडमीतर्फे आयोजन; रसिकांना मिळणार पर्वणी कराड, ता. १८ : येथील स्वरसंस्कार म्युझिक अकॅडमीतर्फे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी मराठी चित्रपट संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोनदिवसीय संगीत महोत्सवात कराडमधील २५ रसिक गायक सहभागी होणार आहेत. कराड शहर व परिसरातील हौशी रसिक गायकांना आवाज साधना, सुगम संगीत व चित्रपट संगिताचे प्रशिक्षण देणाचे काम स्वरसंस्कार म्युझिक अकॅडमीच्यावतीने चित्रा कुलकर्णी व अभिजित कुलकर्णी करत आहेत. कराडमधील या गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मराठी चित्रपट संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २१) सायंकाळी ६ वाजता कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. यादिवशी ‘गीत उमटले असे...’ हा मराठी चित्रपट गाण्य

स्वर्गीय पी. डी. पाटील साहेब यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी*

Image
*स्वर्गीय पी. डी. पाटील साहेब यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी*     *प्रा.दादाराम साळुंखे* कराड विद्यानगर:- येथील समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालय विद्यानगर सैदापूर येथे स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना प्रा. दादाराम साळुंखे म्हणाले, "स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब यांना कराड नगरीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अनेक वर्षे ते कराड नगरीचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.कराड व पंचक्रोशीतील लोकांसाठी कराडमध्ये भव्य ग्रंथालय तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची समाधी कराड येथील प्रीतीसंगमावर उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भविष्य काळाची दृष्टी लाभलेली एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे."           यावेळी जेष्ठ नागरिक महादेव कांबळे यांनी  ग्रंथालयास ग्रंथ भेट दिली. यावेळी ग्रंथालयाचे संचालक अभिजीत इंगळे, सौ