टपाल खात्यांच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : माणसिंगराव जगदाळे मसूर मध्ये 'डाक चौपाल' चे आयोजन
टपाल खात्यांच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : माणसिंगराव जगदाळे
प्रतिनिधी कराड वार्ता न्युज
पोस्ट खात्यांच्या योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन माजी सातारा जिल्हा परिषदेचे महसूल व शिक्षण सभापती माणसिंगराव जगदाळे यांनी मसूर येथे आयोजित डाक चौपाल कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात केले.
भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी मसूर येथे कराड विभागाचे डाक अधीक्षक दिलीप सर्जेराव यांच्या मार्गदर्शनाखाली टपाल खात्याच्या वतीने 'डाक चौपाल' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इंदिरा गांधी प्रशाला मसूर येथे आयोजित या कार्यक्रमात भारतीय डाक विभागाच्या वतीने कराड डाक विभागाचे अमित देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात सरपंच पंकज दीक्षित, प्राचार्या सुनंदा पाटील, पोस्ट मास्तर मोनाली पाटील, स्नेहल जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वाय एस पवार, एस एस पाटील, एस बी जाधव, पी बी पाटील, डी के जाधव, श्रीमती टी एल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात लाडकी बहीण, मातृत्व वंदना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांसाठी पिकविमा आदी साठी लागणारे खाते तसेच आवर्ती जमा खाते (आरडी), बचत खाते, सावधी जमा, ग्रामीण डाक जीवन विमा. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची विविध खाती अशा विविध योजनांची माहिती ग्राहकांना व विद्यार्थ्यांना देण्यात आली.
भारत सरकारने शंभर दिवसांत पाच हजार ठिकाणी डाक चौपाल कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन मसूर येथे केले असल्याचे सांगण्यात आले.
लाभार्थीना त्यांचे पैसे गावच्या पोस्टमनद्वारे खातेधारकाला प्राप्त करता येणार आहेत. यावेळी केवळ ४०० ते ७०० रुपयांत १० ते १५ लाखां पर्यंतचा अपघाती विमा योजनेचा लाभ देखील ग्राहकांनी घेतला.
या कार्यक्रमासाठी मसूर चे पोस्ट मास्तर अविनाश कदम, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, माजी सरपंच प्रकाश माळी, जमीर मुल्ला, सिकंदर शेख, पत्रकार बाळकृष्ण गुरव, गोपीनाथ कांबळे, अविनाश कदम, महेश माळी, सतीश आलमवाड, प्रणाली खाडे, श्वेता यादव, अरुण जंगम, अफजल महद, ओमकार जाधव, राजेंद्र बाईंग, गौरव कुंभार,अभय कुमार, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व पालक आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व डाक कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment