_*गोळेश्वर, कराड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता शासनाकडून रुपये २५ कोटी ७५ लक्ष निधी मंजूर*_

_*गोळेश्वर, कराड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता शासनाकडून रुपये २५ कोटी ७५ लक्ष निधी मंजूर*_
       भारत देशाला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवुन दिलेल्या स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी मौजे गोळेश्वर ता. कराड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीस खासबाब म्हणून दिनांक 30.07.2009 रोजी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. 
त्यानुसार सदर कुस्ती संकुल उभारणीकरिता मौजे गोळेश्वर ता. कराड येथील जागा ग्रामपंचायतीने तालुका क्रीडा संकुल समिती, कराड यांच्याकडे वर्ग केलेली आहे. प्राप्त जागेवर क्रीडा सुविधा विकसित करण्याकरिता संचालनालयाच्या दिनांक ०६ ऑगस्ट, २०१४ च्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करुन, रुपये १ कोटी वितरित करण्यात आलेले आहेत.
               वितरित केलेला निधी संकुल उभारणीस कमी होता; तसेच प्राप्त जागेवर मे. न्यायालयामध्ये ०३ दावे होते. पैकी शासनाविरुध्दात असलेले दोन दावे तक्रारदार यांनी मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली मागे घेतले. तसेच मा. जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देशित केल्यानुसार प्राप्त जागेची अति अतितातडीचे जागा मोजणी करुन, सदर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १. अडमिन एरिया २. किचन व डायनिंग ३. स्वच्छतागृह ४. जिम ५. व्ही.आय.पी. रुम ६. टिम ए व बी रुम व स्वच्छतागृह ७. ऑडिओ व्हिजुअल रुम ८. फिल्ड ऑफ प्ले -०२ मॅट ९. मुलांची डॉमेंन्ट्री १०. मुलींची डॉमेंन्ट्री ११. सेपरेट टॉयलेट १२. प्रेक्षक गॅलरी (५०० आसन व्यवस्था) या सुविधा विकसित करण्याकरिता शासनास सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.
              सादर करण्यात आलेल्या प्रस्ताव मंत्रीमंडळाने मान्यता देऊन, रुपये २५ कोटी ७५ लक्ष निधी मौजे गोळेश्वर, कराड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता मंजूर केलेला आहे. त्यामुळे मौजे गोळेश्वर ता. कराड येथे ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीची सुमारे १५ वर्षाची प्रतिक्षा संपलेली असून, लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्याच्या करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.

*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश " राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क