शिक्षण क्षेत्रातील असंतोष जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार...अशोकराव थोरात - उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था सघ.
शिक्षण क्षेत्रातील असंतोष जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार...
राज्यातील सर्वच राज्यकर्त्यांचे शिक्षणाविषयी नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. जे शिक्षण घेऊन मोठे झाले. त्यांची शिक्षणाबद्दल तटस्थ वृत्ती. या सगळ्याच्या विरोधात आपणाला काम केलें पाहिजे तरच गरीब , शेतकरी,बहुजन बहुजन समाजाचे शिक्षण होणार आहे,असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था सघांचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी केले. ते पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटीच्या डॉ एपीजे अब्दुल कलाम सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी शिक्षण संस्था सघांचे सचिव एस.टी.सुकरे, शिक्षकेत्तर संघाचे भरत जगताप, संस्था संघटनेचे के.पी.पाटील, कोयना एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर,सदस्य संजीव चव्हाण, पृथ्वीराज पाटील, दादासो जाधव हे उपस्थितीत होते.
अशोकराव थोरात पुढे म्हणाले की, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाविषयीच्या राज्य शासनाच्या उदासीन धोरणाच्या विरोधात विद्यार्थी,समाज, पालक जागृत नाही. पालक म्हणुन आपले अधीकार काय आहेत हेच त्यांना माहिती नाहीत. म्हणून आम्हीं तुम्हाला सावध करतोय.पुढील धोके सांगतोय. आज राज्यात शिक्षणाची विदारक अवस्था निर्माण झाली आहे.आपण समाज घटक म्हणून वेळीच सावध झालो पाहीजे.शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन होऊ शकते. म्हणून राज्यात एकाच वेळी प्रत्येक जिल्हयात मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठीच मंगळवार दि.06 ऑगस्ट 2024 रोजी सातारा येथे राजवाडापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले आहे. यात जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, पदाधिकारी, विविध शैक्षणिक संघटना मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना कर्मचारी , सहभागी होणार आहेत.त्यात समाजातील सर्वच घटकांनी उत्स्फूर्तपणे सामील व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोयना एज्युकेशन सोसायटीचे मा.अमरसिंह (दादा)पाटणकर म्हणाले की , शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे .तो कोणालाही हिरावून घेता येणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळाले पाहिजे. हे शासनाचे कर्तव्य आहे.शासनाला शिक्षण ही गरज का वाटत नाही. बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे. शिक्षक भरती बंदी, शिक्षकेतर भरती बंदी मग शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची कशी, दऱ्या खोऱ्यातील लोकांचे शिक्षण बंद करण्याचा शासनाचा डाव मोडून काढला पाहिजे. म्हणून आपण शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर एकत्रित आलो पाहिजे. शिक्षणाचा जागर केला पाहिजे.शासनाचे विरोधात आपण पुढें आलो पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी मोर्च्यात सहभागी झाले पाहिजे.
शिक्षकेत्तर संघाचे भरत जगताप म्हणाले की, शाळांसमोर अनेक प्रश्न आहेत.ते शासन दरबारी मान्य झाले शिवाय शाळा व्यवस्थीत चालणार नाहीत. शासन भरती बंदीचे चुकीचे निर्णय घेत आहे. याला लोकशाही मार्गाने आंदोलन करणे गरजेचे आहे
यावेळी संजय हिरवे, बालासाहेब कदम, दीपकसिंह पाटणकर, फैयाज शेख, यानी आपलीं मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तालुक्यातील विविध शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक राऊत तर उपस्थित मान्यवरांचे आभार संजय इंगवले यांनी मानले.
धन्यवाद सर
ReplyDelete