*'हर घर तिरंगा, घर घर तिरंगा उपक्रम विविध कार्यक्रमांचे आयोजन करून यशस्वी करावा! पालकमंत्री शंभूराज देसाई
*- पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांकडून जिल्हा प्रशासनाला निर्देश
आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे 'हर घर तिरंगा' उपक्रमासंदर्भात पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा बैठक घेतली. 'हर घर तिरंगा, घर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत सातारा शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करावे. या उपक्रमांतर्गत शासकीय कार्यालये व जिल्ह्यातील धरणांवर विद्युत रोषणाई करावी, अशा सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी दिल्या. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा. तसेच प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment