कराड शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा लवकरच होणार सुरळीत राजेंद्रसिंह यादव
गेल्या महिन्यापूर्वी कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये बिघाड झाल्याने कराड शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता या संदर्भात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेते मंडळींनी कराड येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कराड शहराला पाणीपुरवठा कशा पद्धतीने देता येईल यासाठी लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच पाईपलाईनच्या कामासाठी निधी देखील मंजूर केला होता या संदर्भात यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर कराड शहराला पिण्याचे पाणी देण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे दिवस रात्र पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकण्याचे काम युद्धपातळी सुरू होते आता हे काम आज पूर्ण झाले आहे या संदर्भात चाचणी देखील घेण्यात आली ती चाचणी यशस्वी झाली आहे वारुंजी येथील जॅकवेल मधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे आज यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव मुख्याधिकारी खंदारे तसेच युवा नेते नुरुल मुल्ला यांच्यासह मान्यवरांनी पूर्ण झालेल्या पाईपलाईनची पाहणी केली तसेच दिवस-रात्र पाईपलाईन टाकण्याचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले तसेच पालकमंत्री शंभूराजे देसाई खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी आभार मानले
Comments
Post a Comment