महाराष्ट्रात घडणाऱ्या अत्याचार घटनेचा पाटण शहरात कडाडून निषेध
कराड वार्ता न्युज ग्रुप 9156992811 बदलापूर कलकत्ता पाटण कराड भागात झालेल्या अत्याचार घटनेचा पाटण शहरात निषेध 


बदलापूर कलकत्ता कराड व पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलींवर व महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा पाटण शहरातून मुक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. या घटनेला जबाबदार राज्यकर्त्यांनी नैतिकता सांभाळत आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत व वरील घटनांमधील दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच महिला अत्याचारांच्या विरोधात कडक कायदे, शिक्षा कराव्यात या मागण्यांचे निवेदनही तहसीलदार यांना देण्यात आले.
या मुक मोर्चामध्ये पाटण तालुक्यातील महिला, विद्यार्थीनी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू-भगिनी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
#बदलापूर #पाटण #कोलकाता #कराड #निषेध
Comments
Post a Comment