कराड भाजीपाला मार्केटचा लिलाव आता होणार फक्त एकवेळ.*

*कराड भाजीपाला मार्केटचा लिलाव आता होणार फक्त एकवेळ.*

*शेती उत्पन्न बाजार समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय.* 

*शेतकरी व व्यापाऱ्यांनकडून निर्णयाचे स्वागत.*

कराड/प्रतिनिधी

शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होत असलेल्या मागणीनुसार स्वा. सै.शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट एक वेळ व खुली लिलाव पद्धत सुरू करण्याचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला.शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपसभापती संभाजी चव्हाण,संचालक नितीन ढापरे,गणपत पाटील,जे.बी. लावंड,मनुभाई पटेल,रयत संघटनेचे प्रा.धनाजी काटकर,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते,इफ्कोचे सदस्य हणमंतराव चव्हाण, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील,संचालक अजित पाटील, काँग्रेसचे कराड दक्षिण उपाध्यक्ष नितीन थोरात,सचिव आबा पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
 कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यापूर्वी सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा सुरू रहात होते.दोन वेळच्या लीलावामुळे शेतकरी व व्यापारी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने बाजार समितीकडे शेती मालाचा लिलाव दिवसातून एक वेळ संध्याकाळी खुल्या पद्धतीने भरवावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत होती.त्यानुसार शुक्रवार दि.16 पासून एक वेळ मार्केट आणि खुल्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
 आता शेतीमाल लिलाव दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार असून झालेल्या बदलाची नोंद शेतकरी,आडते,व्यापारी,वाहनधारक यांनी घ्यावी असे आवाहन शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक