कराड:- विद्यानगर सैदापूर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर . रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली.

कराड:- विद्यानगर सैदापूर येथील समाजभूषण  बाबुराव गोखले ग्रंथालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर . रंगनाथन  यांची जयंती ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी कविवर्य कबीर ताटे म्हणाले, डॉ. रंगनाथन हे  ज्ञानप्रसारक होते. त्यांनी जगापेक्षा वेगळे करून दाखवण्याच्या उद्देशाने नोकरी सोडून समाजाला ग्रंथांच्या माध्यमातून परिपक्व बनवण्याचा निश्चय केला. आणि ग्रंथालयाची पंचसूत्री तयार केली. या पंचसूत्रीच्या आधारावरच ग्रंथालयाचा पाया रचला गेला.
याप्रसंगी ताटे सरांनी ग्रंथालयास दहा हजार रुपयांची देणगी देऊन सहकार्य केले.
ग्रंथालयाचे संचालक अभिजीत इंगळे यांनी ग्रंथालय, ग्रंथपाल, वाचन संस्कृती याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास श्री सुभाष टोणपे सौरभ टोणपे, तनुजा चव्हाण, पल्लवी चव्हाण, सीमा कांबळे, रेश्मा कसबे उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक