Posts

Showing posts from August, 2024

_*गोळेश्वर, कराड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता शासनाकडून रुपये २५ कोटी ७५ लक्ष निधी मंजूर*_

_*गोळेश्वर, कराड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता शासनाकडून रुपये २५ कोटी ७५ लक्ष निधी मंजूर*_        भारत देशाला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवुन दिलेल्या स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी मौजे गोळेश्वर ता. कराड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीस खासबाब म्हणून दिनांक 30.07.2009 रोजी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे.  त्यानुसार सदर कुस्ती संकुल उभारणीकरिता मौजे गोळेश्वर ता. कराड येथील जागा ग्रामपंचायतीने तालुका क्रीडा संकुल समिती, कराड यांच्याकडे वर्ग केलेली आहे. प्राप्त जागेवर क्रीडा सुविधा विकसित करण्याकरिता संचालनालयाच्या दिनांक ०६ ऑगस्ट, २०१४ च्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करुन, रुपये १ कोटी वितरित करण्यात आलेले आहेत.                वितरित केलेला निधी संकुल उभारणीस कमी होता; तसेच प्राप्त जागेवर मे. न्यायालयामध्ये ०३ दावे होते. पैकी शासनाविरुध्दात असलेले दोन दावे तक्रारदार यांनी मा....

कराड वार्ता न्यूज नेटवर्क 91 56 99 28 11 बातमी पाटण येथून महाराष्ट्रात होणाऱ्या महिला मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा पाटण येथे कडाडून निषेध

Image
कराड वार्ता न्यूज नेटवर्क 91 56 99 28 11 बातमी पाटण येथून महाराष्ट्रात होणाऱ्या महिला मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा पाटण येथे कडाडून निषेध बदलापूर, कोलकाता, कराड व पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलींवर व महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा पाटण शहरातून मुक मोर्चा काढून निषेध करण्यात आला.  या घटनेला जबाबदार राज्यकर्त्यांनी नैतिकता सांभाळत आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत व वरील घटनांमधील दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच महिला अत्याचारांच्या विरोधात कडक कायदे, शिक्षा कराव्यात या मागण्यांचे निवेदनही तहसीलदार यांना देण्यात आले.            या मुक मोर्चामध्ये पाटण तालुक्यातील महिला, विद्यार्थीनी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी,  कार्यकर्ते, पत्रकार बंधू-भगिनी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. #बदलापूर #पाटण #कोलकाता #कराड #निषेध

महाराष्ट्रात घडणाऱ्या अत्याचार घटनेचा पाटण शहरात कडाडून निषेध

कराड वार्ता न्युज ग्रुप 9156992811 बदलापूर कलकत्ता पाटण कराड भागात झालेल्या अत्याचार घटनेचा पाटण शहरात निषेध   बदलापूर कलकत्ता कराड व पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलींवर व महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा पाटण शहरातून मुक मोर्चा काढून निषेध करण्यात आला.  या घटनेला जबाबदार राज्यकर्त्यांनी नैतिकता सांभाळत आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत व वरील घटनांमधील दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच महिला अत्याचारांच्या विरोधात कडक कायदे, शिक्षा कराव्यात या मागण्यांचे निवेदनही तहसीलदार यांना देण्यात आले.            या मुक मोर्चामध्ये पाटण तालुक्यातील महिला, विद्यार्थीनी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी,  कार्यकर्ते, पत्रकार बंधू-भगिनी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. #बदलापूर #पाटण #कोलकाता #कराड #निषेध