महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ पदविका औषध निर्माणशास्त्र (डी. फार्म) प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला

कॉलेज ऑफ फार्मसीडी फार्म) घोगाव, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्वल यश

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ पदविका औषध निर्माणशास्त्र (डी. फार्म) प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव, ता. कराड या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे.
त्यामध्ये प्रथम वर्षाचा निकाल ८१.२ टक्के लागला असून  आदित्यराज दीपक कुंभार याने ८२.६० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, प्रियांका संजय काकडे ७६.७ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तन्वी तानाजी बागल ७५.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक, मयुरी रमेश मस्कर ७४.८० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक व आदित्य राजाराम कुचेकर याने ७३.४० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला.
तसेच द्वितीय वर्षाचा निकाल ८० टक्के लागला असून रूतुजा प्रदीप मोहिते व नम्रता  अण्णासो कचरे या दोघींनी ७९ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला. तर गौरी कोंडिबा शेळके हिने ७७.९१ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, प्राची सुभाष बाबर ७६.८२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक, पुनम निवृत्ती पाटील व शीतल संजय देसाई या दोघींनी ७६.४६ टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक व सानिया मुस्ताक चंद्रगडी हिने ७६.१८ टक्के गुणासह पाचवा क्रमांक मिळवला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा  डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक