सीए. दिलीप गुरव सहकार क्षेत्रातील कोहिनूर हिरा :डॉ.सीए.शिवाजीराव झावरे

सीए. दिलीप गुरव सहकार क्षेत्रातील कोहिनूर हिरा :डॉ.सीए.शिवाजीराव झावरे
कराड,दि.9
कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांचा वाढदिवस दि.6 जुलै रोजी बँकेच्या सेवकांच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.सीए.शिवाजीराव झावरे, कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सीए. यशवंत कासार, कराड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल लाहोटी यांच्या हस्ते बँकेच्यावतीने सीए.दिलीप गुरव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 
मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत अत्यंत कमी वयात एखाद्या सहकारी बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होण्याचा मान मिळवला. बँकेचे व्यवस्थापन आणि संचालक मंडळ, ग्राहक-सभासद यांचा मेळ घालत बँकेस सहकारातील यशस्वी बँक केली असून यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे गौरवोद्घार सीए. दिलीप गुरव यांचे गुरू, झावरेज्‌‍ प्रोफेशनल ॲकॅडमीचे संस्थापक डॉ.सीए. शिवाजीराव झावरे यांनी काढले. 
सीए.दिलीप गुरव यांनी बँकेच्या प्रगतीसाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. यासाठी त्यांनी बँकेमध्ये विविध बदल करत उच्चशिक्षित सेवकांना योग्य संधी उपलब्ध करून दिल्या. यामुळे संचालक मंडळाने त्यांच्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा त्यांनी वेळोवेळी पूर्ण केल्या आहेत. जोपर्यंत बँकेचा एन.पी.ए. शन्य टक्के होत नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा न करण्याचा निश्चय सीए.दिलीप गुरव यांनी त्यांच्या 2022 मधील वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी केलेला होता. या निश्चयपूतसाठी त्यांनी दीड-दोन वर्षांच्या कालावधीमध्ये खूप कष्ट घेतले आणि मार्च 2024 ला बँकेचा नेट एन.पी.ए. शून्य टक्के करून संचालक मंडळास दिलेला शब्द पूर्ण केला असे यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी सांगतले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल लाहोटी, संचालक शशांक पालकर, सीएस. स्वानंद पाठक, सीए.अतुल दोशी, डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.जयश्री गुरव, कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सीए. यशवंत कासार तसेच कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रतिनिधींनी सीए.दिलीप गुरव यांच्या कार्यकर्तुत्वाबद्दल माहिती देत असताना अनेक अनुभव आपल्या मनोगतातून सांगितले.
यावेळी सत्कारास उत्तर देताना सीए.दिलीप गुरव यांनी सांगितले, स्व.डॉ.द.शि.एरम यांच्या आशिर्वादाने आणि कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेतली यासाठी माझ्या कुटुंबानेसुद्धा मला सहकार्य केले. यामेहनतीस सेवकांनीसद्धा खूप प्रयत्न करत मोलाची साथ दिली. पूव असलेल्या केंद्रीत अधिकारांचे विकेंद्रीकरण करत मुक्त व्यवस्थापन स्विकारत सेवकांना पदनिहाय अधिकार प्रदान केले, यामुळे निर्णय क्षमता गतिमान झाली आणि पर्यायाने बँकेच्या व्यवसायात वाढ होत आहे. माझ्यासारख्या सेवकाचा वाढदिवस अर्बन कुटुंबप्रमुख, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व सेवकांनी करणे हे माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगत सीए.दिलीप गुरव यांनी आयोजित केलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. 
सीए. दिलीप गुरव यांनी वाढदिवसानिमित्त हार-तुरे न स्विकारता स्वेच्छेने डॉ.द.शि.एरम अपंग सहाय्य संस्थेस आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले होते. सदरच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत बँकेच्या सेवकांनी तसेच हितचिंतकांनी डॉ.द.शि.एरम अपंग सहाय्य संस्थेस आर्थिक स्वरूपात मदत दिली.
बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीस उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक करत असताना सीए.दिलीप गुरव यांचा जीवनपट सांगितला. यावेळी संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी व बँकेचे सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक महाव्यवस्थापक शशिकांत डुबल व आभार उपमहाव्यवस्थापिका सविता लातूर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक