_१ लाख ५ हजार रुपयांचा ७५ इंची इंटरॅक्टिव बोर्ड गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळामाऊलीस भेट..._*
*_१ लाख ५ हजार रुपयांचा ७५ इंची इंटरॅक्टिव बोर्ड गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळामाऊलीस भेट..._*
महात्मा गांधी विद्यालय,काले या शाळा माऊलीचे सन १९९४-९५ बॅच चे माजी विद्यार्थी, ग्रेटवॉल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी,पुणे चे सीईओ व ओबामा फाउंडेशन,अमेरिका चे नॅशनल प्रेसिडेंट
*मा.डॉ.संग्रामसिंह रामराव माळी (साहेब)*
यांच्याशी अनेक दिवसापासून शाळा माऊलीच्या भौतिक सुविधांच्या योगदानासाठी संपर्कात राहण्याचा योग आला.
माळी साहेबांना इंटरॅक्टिव बोर्डचे कोटेशन पाठवल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यास होकार दिला. व बोलताना म्हणाले की
_"विकास पाटील आपण शाळा माऊली साठी देत असलेले योगदान खूप लाखमोलाचे आहे.आपल्या या कार्याला आम्ही वेळोवेळी मदत करतच राहू ही फक्त मदतीची सुरुवात आहे ."_
रविवार २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेला साहेबांचे बंधू व चपने मळी,काले चे पोलीस पाटील मा. सुनील माळी यांचा सकाळी कॉल आला, साहेबांनी चेक दिला तो आम्ही द्यायला येत आहे. हे ऐकून मनस्वी आनंद झाला.
या बंधूनी आपले वडील
*कै.श्री.रामराव बाबुराव माळी (तात्या)*
यांच्या *स्मृतिप्रित्यर्थ...*
*गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून...*
शाळा माऊलीच्या अत्याधुनिक शैक्षणिक वाटचालीसाठी
*_१ लाख ५ हजार रुपयांचा ७५ इंची इंटरॅक्टिव बोर्ड_*
साठीचा चेक दिला.
साहेब आपल्या दातृत्वास आमचा सलाम आहे. आपल्या शाळा माऊलीला न विसरता तिचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने जे योगदान दिलेत त्यासाठी आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
*इंटरॅक्टिव बोर्डची वैशिष्ट्ये*
*_इंटरॅक्टिव पॅनेल बोर्ड हा smart education प्रक्रियेचा एक भाग आहे. हा बोर्ड पूर्णपणे टच स्क्रीन आहे. याच्या मदतीने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त चालू घडामोडी तसेच जगभरातली माहिती मिळू शकेल. शिक्षकांनी फक्त पेनड्राईव्ह घेऊन वर्गात जायचं आहे. पेनड्राइव्हवच्या मदतीनं त्यांना सर्व अभ्यासक्रम शिकवता येऊ शकेल._*
*_त्याचबरोबर Google किंवा YouTube च्या मदतीने अध्यापन करता येणार आहे. हा स्मार्ट बोर्ड पूर्णपणे Mobile किंवा Laptop सारखाच असणार असून शिक्षकांनी शिकवलेले सगळे मुद्दे यात सेव्ह होणार आहेत. यामुळे शिकवताना एखादा मुद्दा लक्षात आला नाही तरी स्लाईडनुसार पुन्हा मागे घेऊन तो मुद्दा विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवता येईल. या बोर्डवर लिहिण्याची व पुसण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे._*
*_या इंटरॅक्टिव बोर्ड Android System असल्याने त्या वर सर्व Educational Software वापरता येऊ शकतात. तसेच laptop/Desktop हे सुद्धा आपण HDMI Cable अथवा WIFI द्वारे जोडु शकतो._*
सदर इंटरॅक्टिव बोर्ड साठी शाळा माऊलीचे माजी विद्यार्थी मा.संदीप साळुंखे यांनी देखील विशेष प्रयत्न केले.
यावेळी चेक देताना मा.संदीप साळुंखे व मा.अमोल साळुंखे (फौजी) उपस्थित होते.
साहेब आपल्यासारखे हजारो संग्राम या शाळा माऊलीच्या अत्याधुनिक रूपासाठी , आधुनिक वाटचालीसाठी पुढे यावेत हीच इच्छा आहे.
साहेब पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार....
*_तात्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..._*
🙏🏻😊
*आपलाच*
✍🏻 *श्री.विकास पांडुरंग पाटील*
*स्कूल कमिटी सदस्य, महात्मा गांधी विद्यालय काले*
Comments
Post a Comment