कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. पवन प्रदीप यांनी क्लिनिकल फार्माकोलॉजी इन ड्रग डेव्हलोंपमेंट या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्या ते ग्लोबल क्लिनिकल फार्माकोलॉजी अँड फार्माको काइनेटिक्स एम. एस. एन लॅबोरेटोरिज, प्रा.लि.चे प्रमुख आहेत.
औषध निर्माण क्षेत्रात नवीन ड्रग तयार करताना विविध क्लिनिकल चाचण्या असतात. त्या चाचण्या कशा पद्धतीने केल्या जातात नवीन ड्रग किंवा औषध कसे तयार केले जाते. त्यासाठी कोणत्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत, क्लिनिकल स्टडीजचे कोणते प्रकार आहेत, नवीन ड्रगसाठी मान्यता कशी मिळते, तसेच कोणत्या गोष्टी सातत्याने पडताळाव्या लागतात अशा विविध गोष्टीवर डॉ. पवन यांनी मोलाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व प्रस्तावना प्रा. मोनिका चवरे यांनी केले.U
Comments
Post a Comment