कराड शहराला विस्कळीत झालेला पाणीपुरवठा येत्या पाच दिवसात सुरळीत होणार यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष मा श्री राजेंद्रसिंह यादव
कराड शहराला विस्कळीत झालेला पाणीपुरवठा येत्या पाच दिवसात सुरळीत होणार यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष मा श्री राजेंद्रसिंह यादव यांची माहिती पाईप लाईन मध्ये बिघाड झाल्याने कराड शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड येथे भेट देऊन कराड शहराला तात्काळ पाणीपुरवठा व्हावा यासाठी यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या त्यांच्या पुढाकाराने व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांच्या प्रयत्नामुळे कराड शहरवासीयांना येत्या पाच दिवसात पिण्याचे पाणी मिळणार आहे सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आज यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष मा श्री राजेंद्रसिह यादव यांनी या ठिकाणची पाहणी केली या वेळी यशवंत विकास आघाडीचे नगरसेवक श्री हणमंतराव पवार ,विजय वाटेगावकर ,प्रीतम यादव, सौ स्मिता हुलवान, किरण पाटील,बाळासाहेब यादव ,गजेंद्र कांबळे विनोद भोसले, ओमकार मुळे, निशांत ढेकळे, शिंदे गटाचे कराड शहर शिवसेनाप्रमुख श्री राजेंद्र माने व शिवसेनेचे पदाधिकारी यदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment