*प्रहारच्या दणक्यानंतर एमएसईबी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू*

*प्रहारच्या दणक्यानंतर एमएसईबी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू*
गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी केली पहाणी
फोटो : रस्त्याच्या दुरावस्थेची पहाणी करताना गटविकास अधिकारी प्रताप पाटील समवेत मनोज माळी, विनोद डुबल व अन्य.
वार्ताहर
कराड
गोवारे (ता.कराड) येथील गजानन हौसिंग सोसायटी ते एमएसईबीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने येथील रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खड्डयांत उतरून आंदोलन केल्यानंतर प्रशासनास जाग आली असून तत्काळ रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी भेट देऊन रस्त्याच्या आवस्थेची पहाणी केली.
  गोवारे, सैदापूर, हजारमाची व विरवडे या चार ग्रामपंचायतीच्या हद्दीपून जाणाऱ्या गजानन हौसिंग सोसायटी ते एमएसईबी रस्त्यात मोठयाप्रमाणात खड्डे पडले आहेत. तर रस्त्याकडेचा नाला मुजल्याने नाल्याचे पाणी रस्त्यातून वहात आहे. वास्तवीक महावितरण, ओगलेवाडी औद्योगीक वसाहत, मुकबधीर शाळा व मोठया प्रमणात लोकवसाहत असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठयाप्रमाणात वर्दळ सुरू असते. वर्दळीचा रस्ता असतानाही प्रशासनाच्या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती.
आखेर प्रहार जनशक्तीचे मनोज माळी यांनी स्थानिक रहिवाशांना सोबत घेऊन खड्डयात बसस्gन आंदोलन केल्यानंतर खडबडून जगे झालेल्या प्रशासनाने ताताडीने तात्पुरते रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. रस्त्याकडेच्या नाल्यातील झाडेझुडपे व माती कचरा काढून नाला वहाता केला आहे. तर मुरूम टाकून संपुर्ण रस्त्यातील खड्डे मुजवण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी भेट देऊन एमएसईबी मुख्य रस्ता व आंतर्गत रस्त्यांची पहाणी केली. यावेळी आवश्यकता असेल तिथे आंतर्गत रस्त्यात तत्काळ मुरूम टाकण्याच्या सुचना त्यांना ग्रामपंचायतीला दिल्या. यावेळी मनोज माळी, हजारमाचीचे उपसरपंच विनोद डुबल, सदस्य अवधुत डुबल, प्रविण नांगरे, शिवाजी चव्हाण, भानुदास डाईंगडे, ग्रामसेवक एन.व्ही.चिंचकर, महिला व नागरीक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात