*साळशिरंबे ग्रामपंचायतीचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.*उंडाळे -प्रतिनिधी.
*साळशिरंबे ग्रामपंचायतीचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.*
उंडाळे -प्रतिनिधी.
साळशिरंबे (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीने मोदी आवास घरकुल योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याची दखल जिल्हा परिषदेने घेत साळशिरंबे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मा.शरद चव्हाण यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी मा. शरद चव्हाण यांनी मोदी आवास घरकुल योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या या कामगिरीची दखल जिल्हा परिषदेने घेत साळशिरंबे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.महादेव घुले, प्रकल्प संचालक श्री.संतोष हराळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प. जि.प.सातारा श्रीमती अर्चना वाघमळे,कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केल्याबद्दल सरपंच श्रीमती प्रमिला कुंभार, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment