श्री मळाई देवी शिक्षण संस्था मलकापूर व विज्ञान प्रबोधिनी कराड यांच्या संयुक्त विद्यमाने .

आ.च. विद्यालय मलकापूरच्या वतीने आगाशिव डोंगर परिसरात वृक्षारोपण बिजारोपण संपन्न...
    श्री मळाई देवी शिक्षण संस्था मलकापूर व विज्ञान प्रबोधिनी कराड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी बीजारोपण व वृक्षारोपण हा पर्यावरण पूरक उपक्रम नुकताच आगाशिव डोंगर परिसरामध्ये राबविण्यात आला.
    याप्रसंगी वनविभाग मलकापूर या ठिकाणी वृक्षारोपणाने  कार्यक्रमाचे   उद्घाटन घेण्यात आले. याप्रसंगी वनरक्षक मा. श्री कैलास सानप, वन कर्मचारी पिनू पाटील,वनसेवक भरत पवार,आ च विद्यालयाच्या प्राचार्या सौ.ए.एस. कुंभार,विज्ञान प्रबोधनीचे सहसचिव श्री कांबळे  सर,तसेच एडवोकेट शुभम जाधव,मित्रपरिवार ग्रुपचे अध्यक्ष मयुरेश चव्हाण, शिक्षक, विद्यार्थी वनविभाग कर्मचारी उपस्थित होते.
    आगाशिव डोंगर परिसरामध्ये गेले पंचवीस वर्षे सातत्याने बिजारोपण वृक्षारोपण केले जात आहे.या वर्षी बीजारोपणासाठी इ. 5 वी व इ. 6 वी 300 विद्यार्थी तर  दुसऱ्या गटामध्ये इ.7वी ते 9 वी मधील 345 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी 250 रोपांची लागवड केली. तसेच जवळपास पंधरा हजार बियांचे रोपण केले.
   संस्थेचे सचिव अशोकराव थोरात मार्गदर्शन करताना म्हणाले संस्थेचा सामाजिक व पर्यावरण संवर्धन विषयक उपक्रम दिवसेंदिवस अधिकच बहरत, फुलत चाललेला आहे. विद्यार्थी, शाळा, संस्था, वनविभाग यांच्या प्रेरणेतून हा पर्यावरण विषयक उपक्रम बहरतोय त्याचा सकारात्मक परिणाम समाजात पाहायला मिळतोय.वृक्षारोपणाचे महत्त्व पर्यावरण प्रेमींना कळलेलं आहे.त्यांच्याकडून  केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. ही आम्हा सर्वांसाठी कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या बिजारोपण वृक्षारोपणाचे संगोपन करण्याचे काम समाजाने स्वीकारावे. असे आवाहन पर्यावरण प्रेमींना केले.
    कार्यक्रमाची प्रास्ताविक  प्राचार्य सौ ए एस कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन व उपस्थित सर्वांचे आभार श्री कांबळे सर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक