लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पुतळ्याचे सोमवारी अनावरण

लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पुतळ्याचे सोमवारी अनावरण 

आ. भाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती, कोयना बँकेच्या कराड प्रशासकीय कार्यालयाचेही होणार उद्घाटन
 
कराड/प्रतिनिधी : –

कराड येथील  कोयना सहकारी बँक प्रशासकिय कार्यालयचे व मुख्य कार्यालयाच्या समोर माजी मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील- उंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा साकरण्यात अला असून त्याचा अनावरण समारंभ लोकनेते स्व विलास काका पाटील यांच्या जयंतीदिनी सोमवार, दि. १५ जुलै रोज़ी दुपारी २ वाजता भारतीय शेतकरी कामगार  आ. भाई जयंत पाटील व माजी महसूल मंत्री आ बाळासाहेब पाटील  यांच्या शुभहस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण हे असतील
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सामाजिक न्याय मंत्री, माजी खा. जयवंतराव आवळे, राज्यमंत्री आ सतेज पाटील, माजी राज्य मंत्री आ. विश्वजीत कदम,सांगलीचे खा. विशाल पाटील, आ संग्राम थोपटे, कोयना सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समिटीचे सरचिटणी व रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष
अँड उदयसिंह पाटील यांची असणार आहे.
तरी बँकेच्या सर्व सभासदांनी ठेवीदार हितचिंतकांनी या
मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने व सर्व संचालकांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अंकिता पाटील यांचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कराडकर यांच्या वतीने सत्कार

लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार