किल्ले वसंतगडवर करण्यात आला झाडांचा सातवा वाढदिवस.
टीम वसंतगड ने 2017 साली वसंतगड वरती 350+ झाडे लावले होते. टीम फक्त झाडे लावून थांबली नाहि तर ती झाडे जपण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम करन्यात आले एक एक वेळेस तर किल्ले वसंतगड वरीलकृष्णा तलावातून पाणी बॉटल भरून भरून आणून पानी घातले गेले.. झाडे जागवण्यासाठी होणारी धडपड पाहून वसंतगड गावचे सरपंच व टीम चे मार्गदर्शक श्री. अमितदादा नलवडे यांच्या साह्याने किल्ले वसंतगड वरती झाडे जगवण्याकरिता सोलर पंप देण्यात आला जेणेकरून लावलेले झाडे जगण्याची इच्छाशक्ती अधिक वाढली. प्रत्येक रविवारी झाडांना पाणी घालण्याचे काम सुरळीत चालू झाले. पण हे वाटते तितके सोपे नव्हते प्रत्येक रविवारी जाऊन गडावर झाडांना पाणी घालने. त्या झाडांनाही कदाचित टीमच्या जिद्दीला साथ देऊशी वाटली असेल असेच काही..कित्येक ऊन वारा पाऊस सहन करत ते ठाम उभे राहिले टीमच्या कष्टाची साक्ष देत.. झाडे जगवताना प्रत्येकांच्या डोळ्यां समोर एकच ध्येय असायचे गडावर येणाऱ्या लोकांना गारवा व रान मेवांचा मनसोक्त आनंद घेता यावा या विचाराने मनाशी जिद्ध धरून प्रत्येकाने केलेली धडपडीचा आनंद उत्सव म्हणून झाडांचा वाढदिवस हा प्रत्येक वर्षी उत्कृष्ट पद्धतीने साजरी करन्यात येतोच. त्या प्रमाणेच या वर्षीचा झाडांचा ७ वा. वाढदिवस देखिल जल्लोषातच साजरी करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून.. कराडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार व निसर्गप्रेमी मा. श्री.विजय पवार साहेब व त्यांच्या पत्नी सौ.अनुराधा पवार मॅडम यांनी किल्ले वसंतगड येथे झाडांचा वाढदिवस या उपक्रमात सामील होवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच सारथी सायन्स इन्स्टिट्यूट कराड चे विद्यार्थी व कानिनजुकू चॅम्पियन्स कराटे अकॅडमी, सांगली यांची ही या कार्यक्रमात उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला. तसेच कराड तहसिल चे तहसीलदार श्री. विजय पवार साहेब यांनी काही दिवसांपूर्वी स्वतः बियांचे रोपण करून छोटी झाडे तयार केली त्या झाडांना गडावर नेवून त्यांनी त्याचे रोपण केले ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीसाठी काही तरी करून दाखवण्याचा पण साहेबानी घेतला आहे त्या दिशेने तहसिलदार पवार साहेब यांची वाटचाल सुरू आहे सलाम आहे या पवार कुटुंबास ....
या कार्यात आम्हाला आपणासारख्या अधिकाऱ्यांची साथ मिळते हे आम्हा दुर्ग सेवकांचे भाग्यच म्हणायला हवे.
किल्ले वसंतगड चा कायापालट होण्याकरिता आपल्या सारख्या अधिकारी लोकांचे मार्गदर्शन हे सतत होणे गरजेचे आहे .
कराडचे RTO श्री चैतन्य कणसे साहेब. नायब तहसिलदार श्री युवराज पाटील साहेब. आणि तुम्ही सदैव गड संवर्धन कार्यात सोभत असाल याची खात्री आहे......
*टीम वसंतगड*
कार्य हीच ओळख....
Comments
Post a Comment