*निवासराव थोरात यांच्या नेतृत्वात दूध दरवाढीबाबत आंदोलन* कराड उत्तर मधील शेतकऱ्यांनी उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून तीव्र आंदोलन केले. *उंब्रज* : दूध दराला राज्य शासनाने 5 रु. अनुदान दिल्याच्या घोषणेला शेतकऱ्यांनी नाराजी दाखवून दुध दर किमान 40 रुपये मिळालेच पाहिजेत तरच शेतकरी जगू शकेल यासाठी कराड उत्तरमधील शेतकऱ्यांनी कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील किसान काँग्रेसने उंब्रज येथे महामार्ग रोखून धरला.यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश मोहिते, सिनेट सदस्य अमित जाधव, माजी जि. प.सदस्य मारुतीराव जाधव,मधुकर जाधव, उपाध्यक्ष इंद्रजीत जाधव ,सेवादलाचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, वहागावचे सरपंच संग्राम पवार , सुनील पाटील , जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, सेवादल सरचिटणीस उमेश साळुंखे, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज पवार, उपाध्यक्ष प्रवीण वेताळ, प्रदीप निकम, वसंत पाटील, चंद्रकांत साळुंखे, प्रताप पवार, संजय घाडगे, धनाजी सपकाळ , अनिकेत पवार, अतुल थोरात, शहानूर देसाई, प्रकाश पिसाळ , निवास जाधव, दादासो मोहिते, विशाल मोहिते सर्व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व दुध उत्पादक उपस्थित होते आदी सह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने दुधाला 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी हे तटपुंजे अनुदान शेतकऱ्यांना अजिबात मान्य नाही. सद्या गाईच्या दुधाला 24 रु दर दिला जातो जो दर 2012 साली होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या काळात दुधाला 38 ते 40 दर दिला गेला पण त्यानंतर सद्याच्या शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अन्याय करीत दुधाला 24 रु च दर देत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे अशा मध्ये शेती परवडत नसल्याने शेतकरी दुधाचा जोडधंदा करत आहे. अशावेळी दुधाला दर देण्याऐवजी 5 रु. इतके तटपुंजे अनुदान राज्य सरकार देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. यामुळे राज्यातील दुध उत्पादक नाराज असून आता सरसकट दुधाला 40 रु दर मिळालाच पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरला आहे. भेसळयुक्त दुधावर राज्य शासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. यामुळेच भेसळ करणाऱ्यांना शासन एकप्रकारे पाठीशीच घालत आहेत. या भेसळयुक्त दुधाचा मलिदा नक्की कोण खात आहेत. दुधाचे जरी दर कमी झाले असले तरी खाद्याचे, औषधं व चाऱ्याचे दर काही कमी झालेले नाहीत तरी दूध उत्पादकांनी महागाई व दुष्काळी परिस्थितीवर मात करीत दूध व्यवसाय टिकवला आहे. शिक्षत युवा वर्ग शेतीसोबत दुधाचा व्यवसाय जोडव्यवसाय म्हणून करीत असल्याने राज्य शासनाने किमान 40 रु. दुधाला दर द्यावा अशी मागणी यानिमित्ताने करीत आहोत.
कराड उत्तर मधील शेतकऱ्यांनी उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून तीव्र आंदोलन केले.
*उंब्रज* : दूध दराला राज्य शासनाने 5 रु. अनुदान दिल्याच्या घोषणेला शेतकऱ्यांनी नाराजी दाखवून दुध दर किमान 40 रुपये मिळालेच पाहिजेत तरच शेतकरी जगू शकेल यासाठी कराड उत्तरमधील शेतकऱ्यांनी कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील किसान काँग्रेसने उंब्रज येथे महामार्ग रोखून धरला.यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश मोहिते, सिनेट सदस्य अमित जाधव, माजी जि. प.सदस्य मारुतीराव जाधव,मधुकर जाधव, उपाध्यक्ष इंद्रजीत जाधव ,सेवादलाचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, वहागावचे सरपंच संग्राम पवार , सुनील पाटील , जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, सेवादल सरचिटणीस उमेश साळुंखे, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज पवार, उपाध्यक्ष प्रवीण वेताळ, प्रदीप निकम, वसंत पाटील, चंद्रकांत साळुंखे, प्रताप पवार, संजय घाडगे, धनाजी सपकाळ , अनिकेत पवार, अतुल थोरात, शहानूर देसाई, प्रकाश पिसाळ , निवास जाधव, दादासो मोहिते, विशाल मोहिते सर्व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व दुध उत्पादक उपस्थित होते आदी सह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने दुधाला 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी हे तटपुंजे अनुदान शेतकऱ्यांना अजिबात मान्य नाही. सद्या गाईच्या दुधाला 24 रु दर दिला जातो जो दर 2012 साली होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या काळात दुधाला 38 ते 40 दर दिला गेला पण त्यानंतर सद्याच्या शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अन्याय करीत दुधाला 24 रु च दर देत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे अशा मध्ये शेती परवडत नसल्याने शेतकरी दुधाचा जोडधंदा करत आहे. अशावेळी दुधाला दर देण्याऐवजी 5 रु. इतके तटपुंजे अनुदान राज्य सरकार देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. यामुळे राज्यातील दुध उत्पादक नाराज असून आता सरसकट दुधाला 40 रु दर मिळालाच पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरला आहे.
भेसळयुक्त दुधावर राज्य शासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. यामुळेच भेसळ करणाऱ्यांना शासन एकप्रकारे पाठीशीच घालत आहेत. या भेसळयुक्त दुधाचा मलिदा नक्की कोण खात आहेत. दुधाचे जरी दर कमी झाले असले तरी खाद्याचे, औषधं व चाऱ्याचे दर काही कमी झालेले नाहीत तरी दूध उत्पादकांनी महागाई व दुष्काळी परिस्थितीवर मात करीत दूध व्यवसाय टिकवला आहे. शिक्षत युवा वर्ग शेतीसोबत दुधाचा व्यवसाय जोडव्यवसाय म्हणून करीत असल्याने राज्य शासनाने किमान 40 रु. दुधाला दर द्यावा अशी मागणी यानिमित्ताने करीत आहोत.

Comments
Post a Comment