कराड वार्ता ब्रेकिंग* *सातारा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी*

*कराड वार्ता ब्रेकिंग*
  *सातारा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी* 
सातारा दि. 24  :  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक   26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात  आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.     सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी   जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहिर केली आहे.
शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबधीत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, तसेच इयत्ता 10वी व 12 वी च्या जुलै 2024 च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू राहतील.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक