धनगर समाजातील महिलांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*
सातारा दि. 14: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत धनगर समाजातील महिलांकरिता सवलतीस पात्र नवउद्योजक माहिला लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्या मधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के मार्जीन मनी उपलब्ध करून देणेची (Front end subsidy) योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. याचा धनगर समाजातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक संतोष जाधव यांनी केले आहे.
सदर योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील ज्या नवउद्योजक महिला केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या आहेत अशा महिला मार्जीन मनी योजनेस पात्र आहेत. त्याकरिता संबंधित उद्योजक महिलेने आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र व बँकेचे कर्ज मंजूरीचे पत्र जोडून विहीत विवरणपत्रात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त प्रस्तावांवर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील लाभार्थी निवड समिती मार्फत निवडीची कार्यवाही केली जाते.
तरी सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी धनगर समाजातील नवउद्योजक माहिला उद्योजकांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे प्रस्ताव दाखल करावेत.
00000
Comments
Post a Comment