यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजाचे दीपस्तंभ व्हावे* प्रा.दादाराम साळुंखे

*यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजाचे दीपस्तंभ व्हावे*
     प्रा.दादाराम साळुंखे 
कराड:-कराड वार्ता समूह 9156992811
 विद्यानगर सैदापूर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयाच्या वतीने दहावीतील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. यावेळी बोलताना ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्रा. दादाराम साळुंखे म्हणाले, "अतिशय खडतर परिश्रम करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण कौतुकास्पद आहेत.समाजात कितीही परिवर्तन झाले तरी प्रतिभावंत विद्यार्थ्यांना सर्वत्र संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी प्रतिभा संपन्न होण्यासाठी वाचनाच्या कक्षा चौफेर वाढविणे गरजेचे आहे. समाजासाठी आजही प्रतिभावंत व्यक्तींची गरज आहे. ज्या देशात वैचारिक श्रीमंती आहे तो देश नेहमी प्रगतीपथावर असतो. शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी भविष्य काळामध्ये समाजाचे दीपस्तंभ व्हावे"
     याप्रसंगी सौ सुनिता जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रंथालयाने वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने दत्त घेतलेल्या स.गा.म. माध्यमिक विद्यालयातील दहावीतील विशेष प्राविण्य प्राप्त मुलांचा ग्रंथ व पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सो कांचन धर्मे, प्रा. दादाराम साळुंखे,सौ.सुनिता जाधव, रुक्साना नदाफ, सीमा कांबळे,संदीप शेळके, धनाजी मोहिते तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी, पालक व वाचक सभासद उपस्थित होते आभार सौ.कांचन धर्मे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात