सातारा लोकसभा मतदार संघात मतमोजणी शांततेत पूर्ण* *श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विजयी घोषित

*सातारा लोकसभा मतदार संघात मतमोजणी शांततेत पूर्ण* 
*श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विजयी घोषित 

कराड वार्ता समूह 
सातारा दि.4 : 45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा 32 हजार 771 इतकी मते अधिक मिळाली. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धिरण व आर अर्जुन यांच्या सह अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते. 
उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची संख्या पुढीलप्रमाणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले – 5 लाख 71 हजार 134, शशिकांत जयवंतराव शिंदे – 5 लाख 38 हजार 363, आनंद रमेश थोरवडे – 6 हजार 485, प्रशांत रघुनाथ कदम – 11 हजार 912, तुषार विजय मोतलिंग – 1 हजार 301, सयाजी गणपत वाघमारे – 2 हजार 501, डॉ. अभिजित वामनराव आवाडे बिचुकले – 1 हजार 395, सुरेशराव दिनकर कोरडे – 4 हजार 712, संजय कोंडिबा गाडे -37 हजार 62, निवृत्ती केरू शिंदे – 2 हजार 674, प्रतिभा शेलार – 1 हजार 123, सदाशिव साहेबराव बागल – 958, मारुती धोंडीराम जानकर – 3 हजार 951, विश्वजित पाटील – उंडाळकर – 3 हजार 438, सचिन सुभाष महाजन – 2 हजार 15, सीमा सुनिल पोतदार – 3 हजार 458, नोटा – 5 हजार 522 या प्रमाणे मते मिळाली आहेत. तसेच अवैध मतांची संख्या एकूण 2 हजार 180 आहे.  प्रदत्त मते - 25 आहेत.
मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण यंत्रणेने सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल जि्ल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी यांनी संपूर्ण यंत्रणेचे आभार मानले. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेबद्दल पोलीस यंत्रणेचेही आभार मानले.
00000

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक